आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढवळेश्वर शेतकरी पॅनलला बहुमत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड- तालुक्यातील देभेगाव विकास सोसायटीच्या निवडणुकीत ढवळेश्वर शेतकरी सहकारी विकास पॅनलचे सर्व संचालक बहुमताने निवडून आले. देभेगाव विकास संस्थेच्या १२ संचालकांसाठी रविवारी निवडणूक झाली. यामध्ये माजी सरपंच सुरेश आबा बोडखे यांच्या नेतृत्वाखालील ढवळेश्वर शेतकरी विकास पॅनलचे गुलाब थोरात (१९५), अरुण बोडखे (१९३), कारभारी बोडखे (२१५), योगेश बोडखे(२०६), रामदास बोडखे (२०१), सुरेश बोडखे-(२२४), अण्णा वेताळ (२०४), शेख लतिफ शेख अब्दुल- (१९०), आजीनाथ पवार (२२१), कडुबा थोरात (२२४), मंदाबाई बोडखे (२२८), लक्ष्मीबाई बोडखे (२२४) हे निवडून आले. मागील २० वर्षांत येथे प्रथमच निवडणूक झाल्याचे अरुण बोडखे यांनी सांगितले.