आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुमेह रुग्णांच्या बजेटचीही वाढली शुगर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मधुमेहाचा सामना करण्यासाठी उपयोगात आणले जाणार्‍या इन्शुलिनच्या दरामध्ये सुमारे 4 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच, जीवरक्षक औषधे व संशोधनासाठी लागणर्‍या उत्पादनांच्या दरातही सुमारे 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होणार्‍या चलनवाढीमुळे या वर्गातील ही औषधे आयात करावी लागत असल्याने दरवाढ झाल्याची माहिती केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गोरख चौधरी यांनी दिली. कधी अनुवंशिकता, तर कधी चुकीच्या जीवनपद्धतीमुळे उद्भवणार्‍या मधुमेहाने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या वाढते आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी महत्त्वाचे औषध ठरलेल्या इन्शुलिनचा उपयोग रुग्णांकडून शहरात मोठय़ा प्रमाणावर करण्यात येतो. सुमारे 50 मिलिलिटरच्या इन्शुलिन बाटलीची किंमत याआधी सुमारे 163 रुपये होती. ती आता 169 रुपये झाली आहे. रुग्णाच्या आजाराच्या स्वरुपानुसार डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने इन्शुलिन घेण्याचे प्रमाण रुग्णापरत्वे वेगळे असल्याची माहिती डॉ. सुयोग भवरे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
आयुर्वेदाचेही उपचार लाभदायी
अँलोपॅथिक औषधांच्या बरोबरीनेच आयुर्वेदाचाही उपचार लाभदायी ठरू शकतो. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपयोगात आणल्या जाणार्‍या या उपचार पद्धतीमुळे इन्शुलिनची मात्रा कमी करता येऊ शकते. काही प्रकारातील मधुमेहावरही आयुर्वेदाच्या उपचारांनी नियंत्रण मिळवता येऊ शकते. डॉ. सुयोग भवरे, आयुर्वेदतज्ज्ञ
चलनवाढीचा परिणाम
सुमारे 75 टक्के इन्शुलिन व काही जीवरक्षक औषधे, संशोधनासाठी आवश्यक उत्पादने आयात करावी लागतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींचा परिणाम होत असल्याने इन्शुलिनच्या किमतीत सुमारे 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गोरख चौधरी, अध्यक्ष, केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, नाशिक