आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात प्रत्येक घरात डायरियाचा रुग्ण, पाणी उकळून प्या, अतिसारावर क्षार संजीवनी उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे जलसाठ्यांत नवीन पाणी आले आहे. या पाण्यात मोठ्या प्रमाणात सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर (धूलिकण) तसेच जिवाणूंचा समावेश असल्याने हे पाणी आरोग्यासाठी अपायकारक ठरत आहे. सोबतच वातावरण बदलामुळे शहरात अतिसार, उलट्यांचे (डिहायड्रेशन) रुग्ण वाढले आहेत. प्रत्येक घरात सरासरी एक रुग्ण असल्यासारखी परिस्थिती असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, क्षार संजीवनीचा वापर करावा, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.
पावसाच्या पाण्यासोबत धूलिकण जलस्रोतांमध्ये जमा होतात. ते अन्ननलिकेवाटे जठरात प्रवेश करून पचनक्रियेत अडथळा निर्माण करतात, असे पर्यावरणशास्त्राचे प्रा. डॉ. सतीश पाटील यांनी सांगितले. नळ योजनेचे म्हणावे त्या प्रमाणात पाणी शुद्ध होत नसल्याने, तर दुसरीकडे फुटलेल्या पाइपलाइनमध्ये नाले, ड्रेनेजचे पाणी शिरल्यास हे पाणी दूषित होत आहे.
अशीक्षारसंजीवनी : २००मि.लि. पाण्यामध्ये चिमूटभर मीठ आणि मूठभर साखर घाला. हे पाणी पीत राहा. यामुळे शरीरातील पाण्याची घट भरून निघेल.

^सध्या अतिसार,उलटीचे रुग्ण लक्षणीयरीत्या वाढले आहेत. लहान बालकांना या वेळी जलसंजीवनी देणे हा प्रभावी उपाय आहे. मात्र, यासोबत ताप असल्यास वैद्यकीय मदत घेणेच उपयुक्त ठरेल. डॉ.मंदार देशपांडे, सचिव, आयएपी

साखरेचे पाणी टाळा
काही लोक फक्त साखरेच्या पाण्याचा वापर करतात, मात्र ते चुकीचे आहे, असे मनपाच्या डॉ. मनीषा भोंडवे यांनी सांगितले. तर पाणी दहा मिनिटे उकळून प्याल्यास आजारांना पूर्णपणे टाळता येणे शक्य आहे. याशिवाय तुरटीचा वापरही करता येतो, असे डॉ. आनंद देशमुख यांनी सांगितले.
\\
बातम्या आणखी आहेत...