आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिझेल टँकर विजेच्या खांबाला धडकताच उडला आगीचा भडका, चालकाचा झाला कोळसा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- डिझेल टँकर विजेच्या खांबाला धडक बसून उडालेल्या आगीचा भडक्यात चालकाचा अक्षरश: कोळसा झाला आहे. बारवाले कॉलेजजवळ पहाटे मंगळवारी पावणे दोन वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.  रामकिसन फड (40, लोहा, नांदेड) असे मृत चालकाचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, औरंगाबादहून नांदेडकडे जाणार्‍या डिझेल टँकरचा टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. टँकर रस्त्याच्या शेजारी असलेल्या विद्युत खांबाला धडकला. त्यानंतर टॅंकरला भीषण आग लागली. चालक रामकिसन फड याचा अक्षरश: कोळसा झाला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला क्लिनरला वाचवण्यात यश आले आहे.

पुढील स्लाइडवर पाहा... अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो आणि व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...