आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारच्या कार्यपद्धतीवरून शिवसेना नेत्यांत मतभिन्नता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादेत झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी हे निझामाच्या बापाचे सरकार असल्याची टीका केली असली तरी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या मते हे सरकार दूरदृष्टीचे आहेे. त्यामुळे सरकारच्या कार्यपद्धतीबाबत सेना नेत्यांत मतभिन्नता असल्याचे स्पष्ट झाले.

सत्तेत येण्यापूर्वी व सत्तेत आल्यावरही शिवसेनेने कायम भाजपला लक्ष्य केले. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यावरही प्रहार केले. एकदा शिवसेनेच्या एखाद्या नेत्याने राज्य किंवा केंद्र सरकारवर टीका केली. तर इतर नेतेही तोच सूर पकडतात. बुधवारी औरंगाबादेत खासदार राऊत यांनी ‘हे निझामाच्या बापाचे सरकार आहे’ अशी टीका केल्याने खळबळ उडाली. राऊत यांचे वक्तव्य युतीतील वाढत्या तणावाचे सूचक असल्याचीही चर्चा सुरू झाली. मात्र, गुरुवारी कदमांनी वेगळीच भूमिका मांडली. मुख्यमंत्री फडणवीस हे दूरदृष्टीचे नेते असल्याची स्तुतीसुमने उधळली.
बातम्या आणखी आहेत...