आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळातून घेतला धडा, स्वत:बरोबर केली गावाची सोय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरापासून अवघ्या 10 किमी अंतरावर असलेल्या बोकूड जळगाव या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावात एका तरुण शेतकर्‍याने बाराशे चौरस मीटर आकाराचे तळे खोदायला सुरुवात केली आहे. जूनमध्ये हे काम पूर्ण होईल. स्वत:च्या मालकीच्या शेतात हे तळे खोदत असून यामुळे 25 लाख लिटर पाणी साचू शकेल. त्याचा आसपासच्या किमान 50 शेतकर्‍यांना फायदा होऊ शकतो.

बोकूड जळगावातील डोंगर प्रसिद्ध आहे. पायथ्याशी माळरान व खाली शेती आहे. पावसाळ्यात या डोंगरातल्या पाण्यामुळे शेतीचे नुकसान होते. शिवाय जमिनीची धूप होते. त्यामुळे या पाण्याचा काही उपयोगही होत नाही. वर्षानुवर्षे ही परिस्थिती कायम आहे.

तरुणाचा नवा प्रयोग : या गावात औरंगाबाद शहरातील मोहंमद हिशाम ओस्मानी या तरुणाने थोडी जमीन घेतली. डोंगराच्या पायथ्याशी जमीन घेतल्याने तेथे एक भले मोठे तळे खोदल्यास पावसाचे पाणी साठवता येईल असा विचार ओस्मानीने केला. लगोलग त्याने त्या दृष्टीने कामही सुरू केले. साठलेले पाणी वाहून जाऊ नये म्हणून सुरुवातीपासूनच तळ्याला पिचिंग (दगडांची ओंजळ) करण्याचाही निर्णय घेतला. तसेच डोंगराच्या पायथ्यापासून आठ ते दहा पाट खोदून काढले, जेणेकरून पावसाचे पाणी इतर तलावांत जाऊन पाणीपातळी वाढेल. तसेच खालच्या शेतांनाही भरपूर प्रमाणात पाणी मिळेल.

संपूर्ण गावाला फायदा
मी 25 लाख लिटर क्षमतेचा तलाव बांधत आहे. या परिसरात 50 विहिरी असून तेवढीच तळीही आहेत, पण त्यांची त्यात पाणी साचत नाही. तलावाला दगड लावून योग्य पिचिंग केले तर या परिसरात भरपूर पाणी साचेल व पिकेही बहरतील.

हिशाम ओस्मानी,
शेतकरी, बोकूड जळगाव