आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक ऑफ महाराष्ट्रावर डिजिटल दरोडा टाकणारा गजाआड, पुणे पोलिसांनी केली अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बँक ऑफ महाराष्ट्रच्या यूपीआय अॅपद्वारे करोडो रुपयांचा डिजिटल दरोडा टाकणाऱ्या टोळीचा सूत्रधार संदीप अशोक मुळे (३०   रा. गोवर्धन ता. रिसोड, जि. वाशीम) याला मेअखेरीस पुणे पोलिसांनी अटक केली. त्याची औरंगाबादच्या विशेष तपास पथकाने ११ दिवस चौकशी केली.

त्याने दिलेल्या जबाबानुसार मुंबईतही या दरोड्याचे धागेदोरे असून पोलिसांचे एक पथक तिकडे रवाना झाले आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक रवींद्र दत्तात्रय सोनजे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात ११ मार्च २०१७ रोजी तर पुणे येथे त्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून मुळे फरार होता.