आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शून्य टक्के व्याजदरात वस्तू खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर, एक्स्चेंज ऑफरचा फायदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दीपावलीच्यामुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत विविध वित्तीय संस्थांच्या ऑफरची सुविधा घेऊन वस्तू खरेदीकडे शहरवासीयांचा कल दिसून येत आहे. टीव्ही, रेफ्रिजरेटर, वातानुकूलित वस्तू खरेदीसाठी ग्राहक नवीन तंत्रज्ञानावर भर देत आहेत. विजेची बचत करणाऱ्या वस्तूंना अधिक मागणी असून, देशी विदेशी कंपन्यांनी काळाची गरज आेळखून असा प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करून आपली उत्पादने बाजारपेठेत दाखल केली आहेत. ग्राहक पैशाचीही बचत करीत आहे. शून्य टक्के व्याजदरात खरेदी करण्यावर भर आहे. आठ, दहा बारा हप्त्यांमध्ये परतफेड करण्याच्या योजनेकडे ग्राहक आकर्षिला जात असून वर्षातून दोन वेळा अशा प्रकारच्या योजनेचा फायदा घेत मुहूर्तावर वस्तू खरेदीवर भर दिला जात आहे.
अनेक कंपन्यांनी बोनस जाहीर केला आहे. बंॅक खात्यावर जमा झाल्याने ग्राहकांनी खरेदीला सुरुवातही केली आहे. ऐन दिवाळीत बाजारपेठेत पाय ठेवायला जागा नसते म्हणून अनेक जण शनिवार रविवारची सुटी पाहून खरेदी करून टाकतात. दीपावलीचा पाडवा (बलिप्रतिपदा) म्हटला की महत्त्वाची आणि मोठी खरेदी आली. दिवाळी, दसरा, गुढीपाडवा अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर विविध वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. यंदाच्या खूप काळ लांबलेल्या सराफांच्या संपामुळे सोने-चांदीच्या बाजारपेठेकडे ग्राहकांची गर्दी कमीच दिसून आली. परंतु इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीकडे मात्र मोठ्या प्रमाणावर रांगा दिसल्या. दिवाळीसाठीच्या खरेदीसाठी ग्राहकांची चौकशी सुरू झाली आहे. कापड, फटाके आणि इतर छोट्या खरेदीसाठी ग्राहक बोनस आणि पगारातून मार्ग काढतो, परंतु मोठी खरेदी जी की वीस हजार ते दीड लाखापर्यंत असेल तर वित्तीय संस्था आणि कंपन्यांच्या विविध ऑफरची माहिती घेतली जाते. आठवडाभरात ग्राहकांनी विविध वस्तूंच्या चौकशीस प्रारंभ केला. ब्रंॅडेड कंपन्यांची उत्पादने वापरण्याकडे ग्राहकांचा कल दिसून आला. बाजारपेठेत टीव्ही, रेफ्रिजरेटर वातानुकूलित वस्तूंच्या खरेदीवर शून्य व्याजदरात कर्ज उपलब्ध असल्याने मध्यमवर्गीय तथा उच्च मध्यमवर्गीय ग्राहकांचा त्यावर भर आहे. सुलभ बारा अथवा दहा हप्त्यांत कर्जाचा परतावा करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याने सुमारे पन्नास टक्के ग्राहकांनी हा पर्याय निवडलेला आहे. पन्नास टक्के ग्राहक मात्र नगदी पैसे देऊनच विविध वस्तूंची खरेदी करताना दिसत आहे.

पैसे नसताना खरेदी
दिवाळीनिमित्त सूट मिळते. फायनान्सची सुविधा असल्याने शून्य टक्के व्याजदरात खरेदीचा आनंद घेऊ शकतो, अशी सुविधा केवळ शोरूममध्येच असल्याचे टीव्ही डिलर असो.चे अध्यक्ष लक्ष्मण सावनानी यांनी सांगितले.

बाजारपेठेत एक्स्चेंज ऑफर सुरू आहे. जुन्या वस्तू देऊन नवीन वस्तू घरी घेऊन जाण्याची सोय आहे. मोठ्या शोरूममध्ये ७.५ टक्क्यांपर्यंत कॅशबॅक डिस्काउंटची सुविधा आहे. ऑनलाइन खरेदीवर अशा बाबींचा विचार होत नाही. शोरूममध्ये हवी तशी वस्तू घरपोच दिली जाते आणि खरेदी केलेल्या वस्तूची वाॅरंटी असल्याने त्याचाही लाभ ग्राहक घेतात.

खरेदीसाठी करावी लागेल धावपळ
प्रारंभी बाजारपेठेत गर्दी कमी होती, परंतु आता चौथा शनिवार असल्याने चाकरमान्यांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. रविवारी सुटीचा असल्याने असल्याने पुन्हा बाजारपेठा फुलू लागतील. या वर्षी दुष्काळाचे सावट दूर झाल्याने मात्र ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सण आल्याने काहीशी धावपळ होत आहे. शाळा- महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू असून सुटीही ऐन दिवाळीच्या एक-दोन दिवस आधीच लागत आहे. त्यामुळे सर्व काही सांभाळून खरेदीसाठी धावपळ करावी लागणार आहे.

नवीन तंत्रज्ञानावर भर
^नवीनतंत्रज्ञानाद्वारेतयार केलेल्या वस्तूंवर ग्राहक पसंती दर्शवित आहे. शहरातील ग्राहकांचा आेढा नगदीसह विविध वित्तीय संस्थांमार्फत अल्प मुदतीचे कर्ज घेऊन खरेदीकडे मोठा कल आहे. -पंकज अग्रवाल, सानिया डिस्ट्रिब्युटर्स
बातम्या आणखी आहेत...