आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Diploma In Elementary Education Start Sales Application For Admission To First Year

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोकरी नाही, पण प्रवेश तर घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- संपूर्ण राज्यभरात प्राथमिक शिक्षण पदविका अर्थात डीएलएडच्या (डिप्लोमा इन एलिमेंट्री एज्युकेशन) प्रथम वर्ष प्रवेशासाठी अर्ज विक्रीला सुरुवात झाली. त्यासाठीची जाहिरात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांमार्फत काढण्यात आली.
त्यात मे २०१० नंतर शिक्षक भरती झालेली नाही आणि पदविका शिक्षण घेऊन नोकरी मिळेलच, याची शाश्वती नसल्याचे म्हटले आहे. तरीही इच्छुकांनी अर्ज करण्याचे अावाहन करण्यात आले आहे.
२०१३ मधील शिक्षक पात्रता परीक्षेस (टीईटी) पाच लाख ९१ हजार ९९० विद्यार्थी आणि २०१४ मधील परीक्षेस तीन लाख ८८ हजार ६९९ विद्यार्थी बसले हाेते. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे डीएलएड अभ्यासक्रम पूर्ण केलल्या उमेदवारांना नोकरी मिळेलच याची खात्री नाही, असे जाहिरातीत म्हटले आहे. ही जाहिरात आहे की विद्यार्थ्यांना भीती घालणारी सूचना, असा सवाल विद्यार्थी उपस्थित करत आहेत. दरवर्षी बारावीचा निकाल लागताच विविध करिअर तसेच विविध शाखांच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू होते. यंदादेखील डीएलएडच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आणि त्यात नोकरीसंबंधीची सूचना पाहून विद्यार्थी आणखीनच हवालदिल झाले आहेत. शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालकही त्यांना प्रवेश घेण्यासाठी नकार देत आहेत.
३५०० विद्यार्थ्यांची भरतीसाठीची निवड
जिल्हा परिषदेमार्फत शिक्षक भरतीसाठीची परीक्षा (सीईटी) २००९ पासून झालेली नाही. त्यापूर्वी झालेल्या भरतीच्या सीईटीतील जवळपास ३५०० जणांची निवड झाली. पण अद्याप त्यांना पदनियुक्ती मिळालेली नाही. त्यामुळे आता प्रवेश घेऊन नोकरी कधी मिळेल, असा प्रश्न पालक, विद्यार्थ्यांना पडला आहे.
शिक्षकांची थट्टा नको
या पदविका अभ्यासक्रमाचे सुरूवातीला डीएड त्यानंतर डीटीएड आणि आता डीएलएड असे नामकरण करण्यात आले. पण नोकरी मात्र मिळत नाही. शिक्षणाचा खर्च वेगळा, खासगी संस्थेत चुकून नोकरी मिळालीच तर लाखो रुपये भरावे लागतात. एकीकडे प्रवेश घ्या आणि दुसरीकडे नोकरी मागू नका असा अजब सल्ला दिला जात आहे. सर्व डीएलएड, बीएड महाविद्यालयेच बंद करा. पण तरुण बेरोजगार शिक्षकांची थट्टा तरी करु नका. असा सल्ला वजा सूचना आता सर्वांनाच केली जात आहे. मागील दोन वर्षात झालेल्या टीईटीतील लाखो शिक्षक तरुण अद्यापही बेकार आहेत.
संतोष मगर, अध्यक्ष, डीएलएड, बीएड स्टुडंट असोसिएशन
सूचना दिल्या
- प्रवेशासाठी दिलेली जाहिरात ही शासनाकडून आलेल्या सूचनांनुसारच देण्यात आली आहे. अशाच सूचना प्रवेश अर्जावर आणि माहिती पुस्तिकेवरही देण्यात आल्या आहेत.
डॉ. आर. डी. कांबळे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था.