आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिथावणी, आधी : थेट दगडफेक करा, नंतर : समजुतीने मार्ग काढा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खासदार चंद्रकांत खैरे यांनी महापालिका उपायुक्त रवींद्र निकम यांना दम दिला. या वेळी अंबादास दानवे, संतोष जेजूरकर, मोहन मेघावालेही उपस्थित होते. - Divya Marathi
खासदार चंद्रकांत खैरे यांनी महापालिका उपायुक्त रवींद्र निकम यांना दम दिला. या वेळी अंबादास दानवे, संतोष जेजूरकर, मोहन मेघावालेही उपस्थित होते.
औरंगाबाद - अरे,असे कसे कोणी आपल्या मंदिराला हात लावण्याची हिंमत करतो. कोणी अधिकारी मंदिर पाडण्यासाठी आले तर त्यांच्यावर दगडफेक करा, असा प्रक्षोभक सल्ला खासदार चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी (१० डिसेेंबर) मंदिराच्या विश्वस्तांना दिला. मात्र, विश्वस्तांसह नागरिक, कार्यकर्ते त्यास फारसा प्रतिसाद देत नाही, असे लक्षात आल्यावर सामोपचाराने मार्ग काढा, असे म्हणत ते निघून गेले.
राजाबाजार ते गंजेशहिदा मशिदीपर्यंत (बायजीपुरा) रस्ता रुंदीकरणाची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. एकेकाळी दंगलीचे केंद्र असलेल्या या भागात लोकांनी विकासाच्या बाजूने उभे राहण्याची भूमिका घेतल्याने पाडापाडीत सौहार्दाचे वातावरण आहे. त्याला शनिवारी तडा देण्याचा प्रयत्न झाला. जिन्सी परिसरातील खासगेटच्या बाजूला असलेल्या सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या स्थलांतराचा प्रश्न गुरुवारी उभा ठाकला होता. तेव्हा खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असे मंदिराच्या विश्वस्तांनी सांिगतले होते. आमदार अतुल सावेही यांनीही मंदिराची पाहणी करून दोन दिवसांचा वेळ द्यावा, असे म्हटले होते.

आधीकोंडून ठेवा, मग... शनिवारीदुपारी खैरे यांनी मंदिराची पाहणी केली. मग विश्वस्त, नागरिक, कार्यकर्त्यांशी बोलताना ते भडकून म्हणाले, कोणी अधिकारी जास्तच त्रास देत असल्यास त्यांना मंदिरात कोंडून ठेवा. तरीही अधिकारी ऐकत नसल्यास थेट दगडफेक करा. मग आजूबाजूला पाहत खैरे यांनी मनपाचे कर्मचारी अधिकारी येथे असतील तर त्यांनी येथून पळून जावे,’ असे आवाहन केले. त्यानंतर मोबाईलवरून अधिकाऱ्यांशी संपर्क साधत ‘अगोदर मशिदी हटवा. नंतरच मंदिराला हात लावा.’ असेही म्हटले.

विश्वासातघेऊन कारवाई करा : मात्र,त्यांच्या या वक्तव्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मनपा उपायुक्त, अतिक्रमण प्रमुख रविंद्र निकम यांना पाचारण केले. मंदिराच्या सभागृहात बसून त्यांनी निकम यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडल्या.

काही वेळानंतर ‘आधी विश्वस्त, नगरसेवक, भक्तांना विश्वासात घेऊनच कारवाई करा’ अशी सूचना करत ते निघून गेले. यावेळी आमदार संजय शिरसाट, शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, नगरसेवक सचिन खैरे, जयसिंग होलिये, विजय वाघचौरे, रतन घोंगतेसह मंदिराचे विश्वस्त सुनिल धात्रक, फकिरचंद थोरात, सुभाष थोरात, राघव जैस्वाल, पप्पू बनकर, इश्वर जैस्ववाल, आकाश लुटे, बळीराम देशमाने, मनोज लुटे आदींची उपस्थिती होती.
मािर्कंग झालीच नाही

दरम्यान, शनिवारी सुटी असली तरी राजाबाजार भागात मार्किंग करण्याचे ठरले होते. त्यासाठी नगररचना विभागातील कर्मचारी दाखल झाले होते. मात्र, एकही वरिष्ठ अधिकारी नसल्याने मार्किंग झालेच नाही. रविवार, सोमवारी सार्वजनिक सुटी असल्याने आता मंगळवारीच मोहीम सुरू होईल, असे सांगण्यात आले.

चार धार्मिक स्थळे
या रस्ता रुंदीकरणात दोन मशिदींचा काही भाग बाधित होणार असून लक्ष्मी माता, सिद्धेश्वर मंदिर हटवावे लागणार आहे. त्यातील लक्ष्मी मंदिर बाजार समितीच्या जागेवर हलवले. त्यासाठी नगरसेवक फिरोज खान यांनीच तीन दिवसांपूर्वी विश्वस्तांना जागा उपलब्ध करून आहे.

मंदिरासाठी समिना शेख यांनी जाहीर केला २५ लाखांचा निधी
खैरे निघून गेल्यावर स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले, फिरोज खान यांनी सिद्धेश्वर मंदिरासाठी मदतीचे आश्वासन दिले. तर स्थायी समिती सदस्य समिना शेख यांच्यातर्फे २५ लाख रुपये देणार असल्याचे त्यांचे प्रतिनिधी शेख अहेमद शेख इलियास यांनी मंदिराच्या विश्वस्तांना सांिगतले. रविवारी सकाळी सिमेंट, विटा देऊ असे ते म्हणाले. या भागात आपल्या सर्वांना एकत्र राहायचे आहे. त्यामुुळे कोणाच्या सांगण्यावरून वातावरण खराब करण्यात अर्थच नाही, असा सूर हिंदू-मुस्लिम समाजातील नागरिकांनी व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...