आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Director Rishi Bagla,latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भविष्यातील संधी ओळखून लाभ घ्या, ऋषी बागला यांचे आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- उद्योगाच्या कार्यशैलीत आज आमूलाग्र बदल होऊ लागले आहेत. वाढती स्पर्धा आणि ग्राहकांचे समाधान याच्या जोडीला कमी किमतीचा दबावही आहे. येत्या काळात डीएमआयसीच्या माध्यमातून खूप मोठी गुंतवणूक होणार असल्यामुळे संभाव्य संधीचा लाभ कसा घेता येईल, यावरच उद्योगाचे भविष्य अवलंबून असेल, असे मत बागला उद्योग समूहाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक ऋषी बागला यांनी व्यक्त केले.
सोमवारी हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल मॅनेजमेंटच्या वतीने आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. "सेकंड मॅट सिलेक्ट' अंतर्गत "इनोव्हेटिव्ह वेज ऑफ प्रॉफिट ऑटिमायझेशन' या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. व्यासपीठावर आयआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष लालभाई पटेल, उपाध्यक्ष पश्चिम विभाग जी.एस.पालनकर, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पी.पी.रेड्डी, शाखा अध्यक्ष जितेश गुप्ता, उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र जोशी आदींची उपस्थिती होती.
ग्राहकांचा आग्रह उच्च दर्जाचा : लालभाई पटेल म्हणाले, जागतिकीकरणाच्या काळात ग्राहकांचा आग्रह कमी किमतीचा नसून उच्च दर्जाचा आहे. हा दर्जा राखण्यासाठी हा घटक प्रभावी काम करू शकतो. प्रास्ताविक शाखा अध्यक्ष जितेश गुप्ता यांनी केले. कार्यशाळेत व्हिल्स इंिडयाचे उपाध्यक्ष टी. ए. भारती आदींनी मार्गदर्शन केले.
उपाययोजना करा
बागला म्हणाले, पर्चेस आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटमधील काम उद्योगाकरिता अत्यंत महत्त्वाचे असून उद्योगाचा डोलारा त्यावरच उभा असतो. कच्च्या मालापासून ते सर्वोत्कृष्ट उत्पादन ग्राहकापर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाचा घटक असणाऱ्यांनी वेस्टेजचे प्रमाण कुठे आणि कसे कमी करता येईल याविषयी उपाययोजना आखायला हव्यात. जगाला आमच्या उत्पादनाची गरज आहे. त्यासाठी दर्जा, किंमत, कार्यक्षमता, वक्तशीरपणा या सर्वांची सांगड घाला.