आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एन-९ एच श्रीकृष्णनगरात पंधरा दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एन-९ श्रीकृष्णनगरात मागील पंधरा दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागात काही दिवसांपासून चेंबर फुटलेले असून दुर्गंधीयुक्त पाणी मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. या समस्येकडे नगरसेवकांनी लक्ष घालावे, अशी मागणी सुभाष राऊत, किशन प्रधान, सतीश गोसावी, एन. डी. पाटील, सरला लंभाडे, सदाशिव सांगळे आदींनी केली.
या भागात सोडण्यात येत असलेले पाणी स्वयंपाकासाठी योग्य नाही.
नगरसेवक म्हणतात : वॉर्डातदुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. याबाबत संबंधित मनपा अधिकाऱ्यांना दूषित पाण्याबाबत सांगितले आहे. दुसरीकडे वॉटर युटिलिटीचे कर्मचारी टाळाटाळ करीत आहेत. लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल. तसेच फुटलेले चेंबर लवकरच दुरुस्ती करण्यात येईल.

शोभा वळसे, नगरसेविका
दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठाहोत असल्यामुळे लहान लहान मुले आजारी पडत आहेत. या भागातील चेंबरही फुटलेले असून याकडे मनपा प्रशासनाने लक्ष घातले पाहिजे.
-किशन प्रधान, रहिवासी

मागील पंधरादिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. याबाबत नगरसेवकांना सांगूनही लक्ष देत नाही. त्यामुळे नागरिकही त्रस्त झालेले आहेत.
-सुभाष राऊत, रहिवासी
बातम्या आणखी आहेत...