आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैसर्गिक आपत्तीची मदत आता मिळणार दुपटीने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - केंद्रशासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या धर्तीवर बाधित होणाऱ्या आपद‌्ग्रस्त व्यक्ती त्यांच्या कुटुंबीयांना द्यावयाच्या मदतीच्या दरामध्ये दुप्पट वाढ केली आहे. नव्या अध्यादेशानुसार मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत दिली जाणार आहे. पूर्वी हीच मदत केवळ दीड लाखच होती. बीड जिल्ह्यातील पाच आपत्तीग्रस्त कुटुंबीयांना सुधारित अध्यादेशानुसार आणखी दोन लाख ५० हजार रुपये प्रशासनाकडून मिळणार आहेत.

राज्य शासनाने पावसाळा सुरू होण्याच्या आधीच २०१५ ते २०२० या पाच वर्षांसाठी नैसर्गिक आपत्तीमध्ये विविध अडचणींना सामोरे जाणाऱ्या कुटुंबीयांना द्यावयाच्या मदतीसंदर्भातील अध्यादेश अवर सचिव अ. रा. जगताप यांनी काढला आहे. चालू वर्षामध्ये बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाबरोबरच नंतरच्या काळात पाऊस समाधानकारक झाला नसल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. शासनाच्या सुधारित अध्यादेशानुसार जिल्ह्यात दुर्घटना घडल्यास संबंधितांना मदत देण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हास्तरासह सर्व तहसील कार्यालयांमध्ये पावसाळ्यात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. सद्य:स्थितीमध्येही २४ तास हे कक्ष कार्यान्वित आहेत. नियंत्रण कक्षात गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचे निर्देश द्यावेत. तसेच एप्रिल २०१५ पासून ते आजपर्यंत दगावलेली जनावरांची माहिती संकलित करावी संबंधित मालकांना वाढीव मदत देण्याबाबतचे निर्देशही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी नुकतेच दिले आहेत.

पाचकुटुंबीयांना वाढीव मदत..
वडवणीतालुक्यातील चिंचोटी येथील श्रीराम सोपान पाचनकर यांचा ११ एप्रिल २०१५ राेजी वीज पडून मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना तहसील प्रशासनामार्फत दीड लाख रुपयांची मदत घटनेनंतर दाेन दिवसांत, १३ एप्रिल रोजी देण्यात आली होती. याच तारखेला माजलगाव तालुक्यातील नाकल पिंपळगाव येथे दत्ता िदलीप खाडे यांचाही मृत्यू वीज पडून झाला होता. मृत खाडे यांच्या कुटुंबीयांना माजलगाव तहसील प्रशासनामार्फत दीड लाखांची मदत देण्यात आली होती. तर १० जून राेजी केज तालुक्यातील येवता येथे वीज पडून झालेल्या दुर्घटनेत सुनील विष्णू गवळी यांचा मृत्यू झाला हाेता. त्यांच्या कुटुंबीयांना केज तहसील प्रशासनाच्या वतीने दीड लाख रुपये मदतीचा धनादेश देण्यात आला होता. तसेच अंबाजोगाई तालुक्यातील नांदगाव येथे जून रोजी लिंबदेव दगडू राठोड यांचा वीज पडून मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना दीड लाख रुपयांची मदत देण्यात आली होती, तर बीड तालुक्यातील आहेर चिंचोली येथे १० मे रोजी सीमिंता अशोक उंबरे याही वीज पडून दगावल्या होत्या. त्यांचे मूळ गाव शोधण्याचे काम प्रशासकीय यंत्रणेमार्फत सुरू आहे. त्यांच्या कुटुंबीयांना कोणत्या तहसीलद्वारे मदत निधी देता येईल यासाठीचे प्रकरण चौकशीवर असल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्वांच्या कुटुंबीयांना शासनाच्या सुधारित अध्यादेशानुसार आता उर्वरित मदतीचे अडीच लाख रुपये देण्याचे आदेश संबंधित तहसीलदारांना दिल्याचे जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांनी सांगितले.

दोन कुटुंबीयांना मदत
नवीनअध्यादेशानुसार पाटोदा तालुक्यातील धनगर जवळा येथील शकुंतला रायचंद संचेती बंगाली पिंपळा (ता. गेवराई) येथील गणेश भानुदास खरात यांच्या कुटुंबीयांना तहसील प्रशासनाद्वारे चार लाख रुपयांची प्रत्येकी मदत दिली.
बातम्या आणखी आहेत...