आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील 100 गावांचा अापत्ती आराखडा तयार करा, जिल्हाधिका-यांचा अादेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-आपत्तीप्रवण असलेल्या गावांचे सर्वेक्षण करून गावनिहाय आपत्ती वर्गीकरण करून जिल्ह्यातील १०० गावांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले.
महाराष्ट्र राज्य आपत्ती जोखीम व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत आपत्ती धोके व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम २९ जानेवारी ते १३ फेब्रुवारीदरम्यान जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचा प्रारंभ नियाेजन भवनात जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, पुरवठा अधिकारी विकास गजरे, राष्ट्रीय छात्रसेनेचे कर्नल के. व्ही. विठ्ठल, मनपा उपायुक्त प्रदीप जगताप, बटालियन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कुमार राजीव रंजन, तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे नरवीरसिंग रावळ हे उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे नरवीरसिंग रावळ यांनी प्रास्तविक करून सूत्रसंचालन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्ह्यातील २३ विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. यातील कार्यशाळा या शिक्षक, मुख्याध्यापकांसाठी आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेचा शाळा सुरक्षा आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला आहे.
अापत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणप्रसंगी साहित्याची पाहणी करताना जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल.
तलावाकाठचे अतिक्रमण
सप्टेंबर२०१४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत जळगाव शहरात पाणीच पाणी झाले हाेते. नाल्यांना पूर अाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर अाले हाेते. त्यानंतर िजल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी तलावाकाठचे अतिक्रमण काढण्याचे अादेश िदले हाेते. मात्र, त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने गुरुवारी त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. शहरातील तलावाच्या काठावर अतिक्रमण असेल तर तातडीने काढण्याचे अादेशही त्यांनी िदले.
16 पथके गठित
जिल्ह्यातीलसर्वच कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयाचा आपत्ती व्यवस्थापन नकाशा तयार करावा सर्व कर्मचाऱ्यांना आपत्तीच्या प्रसंगी काय करावे? यासाठी प्रशिक्षण देण्याच्या सूचना केल्या. प्रशिक्षणाच्या या कार्यक्रमाला कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद द्यावा. स्थानिक पातळीवरील स्वयंसेवी संस्थांना त्यात सहभागी करून घेण्याच्याही सूचना त्यांनी या वेळी केल्या. तसेच या प्रशिक्षित मनुष्यबळाची १६ पथके जिल्ह्यात आपत्ती निवारणार्थ गठित केली.