आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजसाठी ज्येष्ठांना ‘ड्रॉ’तून सूट, २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक असलेल्या आणि मुस्लिम धर्मीयांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या हज यात्रेचे अर्ज भरण्यास शहरात सुरुवात झाली आहे. यंदापासून केंद्रीय हज समितीतर्फे हज यात्रेला जाणाऱ्या ७० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना ‘लकी ड्रॉ’साठी नंबर लावण्याची गरज पडणार नाही.

यंदापासून वृद्ध यात्रेकरूंना एकटे पाठविण्यास परवानगी नाकारण्यात आली असून, ७० वर्षांपासून पुढे असलेल्या ज्येष्ठांना हज कमिटीचा ‘लकी ड्रॉ’ नंबर लावण्याची गरज नाही. तसेच, सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांच्यासोबत त्यांच्या मुला-मुलींना किंवा नातवंडांना घेऊन जावे लागेल, अशी अट घालण्यात आली आहे. हज यात्रेसाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक अर्जदाराला त्यांनी यापूर्वी हज कमिटीच्या वतीने हज यात्रा केली नसल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून देणे अनिवार्य करण्यात आले आहे. हज यात्रेचे अर्ज मोफत असून, देशातील कोणत्याही राज्यातील हज समितीच्या कार्यालयात ते उपलब्ध होणार आहेत. याशिवाय, हज समितीच्या संकेतस्थळावरूनदेखील ते अर्ज डाउनलोड करून भरून देण्याचीही परवानगी आहे.

७० वर्षांहून अधिक वयाच्या यात्रेकरूंसोबत आतापर्यंत केवळ त्यांच्या पाल्यांना जाण्याची परवानगी होती. आता त्यांच्यासोबत त्यांच्या नातवंडांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. सोमवार(दि. १९)पासून अर्ज देण्यास सुरुवात झाली असून, अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २० फेब्रुवारी २०१५ आहे. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्जदाराने आपले पारपत्र (पासपोर्ट) २० फेब्रुवारीपर्यंत बनवावेत. त्यानंतरचे पारपत्र स्वीकारले जाणार नाहीत. तिकिटे दर मे महिन्यात निश्चित करण्यात येणार आहेत, अशी माहिती खादीमुल हुज्जम हाजी जहीर शेख यांनी दिली.

प्रतीक्षितांना संधी निश्चित
सलगतीन वर्षे अर्ज भरूनही संधी मिळालेल्यांना यंदा निश्चित संधी मिळणार आहे. त्यामुळे त्यांनी आपली मूळ कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत, असे आवाहनही करण्यात आले आहे.