आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Discussion Sessions,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नफ्याच्या प्रमाणात कामगारांना पगार द्यावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- नव्या सरकारने राज्यातील कामगार कायद्यात आमूलाग्र बदल केला नाही, तर कामगारांसह त्यांची चळवळदेखील संपुष्टात येईल. बदलत्या काळात तीनऐवजी चार शिफ्टमध्ये काम घेऊन ६ तास कामाचा कायदा करावा. वाढता शारीरिक व मानसिक ताण बघता सरकारने कामगारांची दरमहा आरोग्य तपासणी कंपनीतच मोफत उपलब्ध करून द्यावी, अशा महत्त्वपूर्ण सूचना शनिवारी "दिव्य मराठी'ने आयोजित केलेल्या चर्चासत्रात कामगार, संघटनांचे पदाधिकारी आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणा-या वकिलांसह उद्योजकांनी मांडल्या.
कामगार कायद्याबाबत सरकारकडून काय अपेक्षा आहेत, त्यात काय बदल हवा, कामगार कायदे खरोखर त्यांच्या हिताचे आहेत काय, त्यांच्या आरोग्याच्या धोरणावर स्पष्ट व कठोर नियमांची अंमलबजावणी करावी काय, कामगार संघटनांसाठी तयार केलेल्या कायद्यात बदल अपेक्षित आहे काय, या विषयावर सर्वांनीच मनमोकळेपणाने मते मांडली. कामगार क्षेत्रात विविध प्रकारे योगदान देणाऱ्या अकरा मान्यवरांनी आपले विचार मांडले. कामगार कायद्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा होण्याची एकमुखी मागणीच यानिमित्त पुढे आली.

जीवन जगण्यापुरते पेन्शन मिळावे
मी माझे अवघे आयुष्य कामगार म्हणून घालवले. बावीस वर्षे नोकरी केली, पण पेन्शन फक्त १७३ रुपये मिळते. हा प्रकार गंभीर आहे. कामगाराला निदान चांगले जगता यावे एवढे तरी सेवानिवृत्तिवेतन मिळावे. ग्रॅच्युइटी, पीएफ याबाबतच्या कायद्यातही मोठ्या सुधारणांची गरज आहे. अख्खे आयुष्य कामगार म्हणून नोकरी केल्यावर जर जगण्यापुरती पेन्शनही मिळत नसेल, तर या कामगार कायद्यांचा उपयोग काय? गरीब-श्रीमंत दरी यामुळेच वाढली. ती कमी करणारे कायदे अस्तित्वात यावेत. छगन साबळे, कामगार प्रतिनिधी, सिटू

बदल स्वीकारण्याची मानसिकता हवी
आता झपाट्याने सर्वच गोष्टी बदलत आहेत. यात मालक कामगारांनी ती मानसिकता ठेवून बदल स्वीकारावेत. लघुउद्योजकांचा प्रश्न गंभीर होत आहे. अत्यंत तुटपुंज्या भांडवलात तो आपला व्यवसाय सुरू करतो. याची दखल शासनाने घ्यावी. अत्यंत कमी नफा तत्त्वावर त्याला आपला व्यवसाय सुरू ठेवावा लागतो. नव्या कायद्यात लघुउद्योजकांसाठी नवे धोरण अवलंबण्याची नितांत गरज आहे. कारण हा उद्योजक जगला तरच मोठे उद्योग जगतील. या उद्योगावर शासनाने लक्ष द्यावे. विदेशात लघुउद्योजकांना खूप गांभीर्याने घेतले जाते. मिलिंद पोहनेरकर, लघुउद्योजक

चर्चेतील मुद्दे
त्रकामगारांना कोणताही कर लावू नये
त्रबँकांनी कर्ज द्यावे
त्रकंत्राटी कामगाराला एका वर्षात कायम करावे
त्रदरमहा आरोग्य तपासणी व्हावी
त्रकायद्यांची कडक अंमलबजावणी व्हावी
त्रसमान काम, समान दाम कायदा लागू करा
त्रबोगस कंत्राटदारांवर अंकुश हवा
त्रकिमान वेतन पंधरा हजार करावे
त्रखासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण हे धोरण
बदलावे
त्रईएसआयमध्ये सुपर
स्पेशालिटी
सेवा मिळावी