आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजित संमेलनाध्यक्ष म्हणाले, उधळपट्टीची व्याख्याच ठरलेली नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाडा सािहत्य परिषदेने आयोजित केलेल्या सत्कार समारंभाला उपस्थित राहण्यापूर्वी डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी दिव्य मराठी कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी संपादकीय सहकाऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. अत्यंत मोकळेपणे झालेल्या या चर्चेत उपरोक्त प्रश्नाच्या अनुषंगाने संमेलनाचे नियोजित अध्यक्ष म्हणाले की, संमेलनाचे स्वागताध्यक्ष पी.डी. पाटील म्हणजे शैक्षणिक आणि अाध्यात्मिकदृष्ट्या श्रीमंत माणूस आहे. त्यांनी ५० ते ६० लाख रुपये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय घेतला आहे हे त्यांनीच मला सांगितले आहे. या वेळी आम्ही त्यांना प्रश्न विचारला की, राज्यातलादुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना साहित्य संमेलनावर उधळपट्टी करणं कितपत समर्थनीय आहे? त्यावर ते म्हणाले, उधळपट्टी कशाला म्हणायचे याची व्याख्याच ठरलेली नाही
मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणूनच माझी शेतकऱ्यांसंदर्भातली भूिमका त्या व्यासपीठावर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्याचा मुलगा म्हणूनच मी तो सन्मान घेणार आहे. त्या सन्मानाने मी मातून जाणार नाही आणि तो िमरवतही बसणार नाही. मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी माणसांसाठी होणारा हा सोहळा साहित्याच्या दृष्टीने श्रीमंत असला पाहिजे असे मला वाटते.

११ कोटी मराठी माणसांचे २५ ते ३० हजार प्रतिनिधी तिथे येणार असतील तर त्यांच्यासाठीचा मंडप फाटके तुकडे जोडून वाकळीसारखा तर करता येणार नाही. तो चांगला भव्यदिव्यच असायला हवा. या प्रतिनिधींच्या डोळ्यांना सुखद संवेदना देणारा, कलात्मक आनंद देणारा, सौंदर्य देणारा असायला हवा. माझ्या ११ कोटी मराठी लोकांच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे. मात्र, हा सोहळा गरिबांचे डोळे दिपवणारा, श्रीमंतीचा माज आणणारा असणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. रोज घरी भाजीभाकरी खाणाऱ्यांना संमेलनाच्या चार दिवस पंचपक्वान्ने खायला िमळणार असतील आणि संयोजक ते त्यांच्या खिशातून देणार असतील तर त्याला माझा मुळीच विरोध नाही. दारूच्या दुकानदाराकडून, तंबाखू विक्रेत्याकडून सक्तीने पैसे वसूल करून किंवा एखाद्या सट्टेवाल्याकडून पैसे घेऊन खर्च करणार असतील तर मी त्या संमेलनाचे अध्यक्षपदच स्वीकारणार नाही. संयोजक १० कोटी रुपये खर्च करणार आहेत की १०० कोटी, हे मला माहिती नाही. तो पैसा कसा आहे हे मला माहिती नाही. त्याबाबत मी संशोधनही केलेलं नाही. एक व्यक्ती, एक संस्था तो पैसा यानिमित्ताने बाहेर काढत असेल तर समाजवादाच्या भूमिकेतून त्याकडे पाहिले पाहिजे, असे मला वाटते.

फाटकेतुकडे जोडून वाकळीसारखा तर करता येणार नाही. तो चांगला भव्य दिव्यच असायला हवा. या प्रतिनिधींच्या डोळ्यांना सुखद संवेदना देणारा, कलात्मक आनंद देणारा, सौंदर्य देणारा असायला हवा. माझ्या ११ कोटी मराठी लोकांच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे. मात्र, हा सोहळा गरिबांचे डोळे दिपवणारा, श्रीमंतीचा माज आणणारा असणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. रोज घरी भाजी भाकरी खाणाऱ्यांना संमेलनाच्या चार दिवस पंच पक्वान्न खायला िमळणार असेल आणि संयोजक ते त्यांच्या खिशातून देणार असतील तर त्याला माझा मुळीच विरोध नाही. दारूच्या दुकानदाराकडून, तंबाखू विक्रेत्याकडून सक्तीने पैसे वसूल करून किंवा एखाद्या सट्टेवाल्याकडून पैसे घेऊन खर्च करणार असतील तर मी त्या संमेलनाचे अध्यक्षपदच स्वीकारणार नाही.

संयोजक १० कोटी रुपये खर्च करणार आहेत की १०० कोटी, हे मला माहिती नाही. तो पैसा कसा आहे हे मला माहिती नाही. त्या बाबत मी संशोधनही केलेलं नाही. एक व्यक्ती, एक संस्था तो पैसा या निमित्ताने बाहेर काढत असेल तर समाजवादाच्या भूमिकेतून त्याकडे पाहिले पाहिजे, असे मला वाटते.

आम्ही विचारले : राज्य सरकार २५ लाख रुपये देते. ते पैसे तर सर्वसामान्यांचे असतात ना?
नियोजितअध्यक्ष म्हणाले, आपले सरकार कमी पैसे देते असे मी म्हणेन. कर्नाटक सरकार तर दोन कोटी रुपये देते. मी अध्यक्ष या नात्याने प्रत्येक जिल्ह्याला तरुणांचे साहित्य संमेलन घेण्यासाठी सरकारने पाच पाच लाख रुपये द्यावेत, अशीच मागणी करणार आहे.