आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृउबास काबीज करण्यासाठी काँग्रेस-भाजपत लागली स्पर्धा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस किंवा भाजपला बहुमत मिळाले नाही. ते सिद्ध करण्यासाठी दोन्ही पक्षांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे चढाओढ शिगेला पोहोचली आहे. सोमवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे माजी आमदार कल्याण काळे यांनी बैठक घेऊन रणनीती आखली आहे. 5 ऑगस्ट रोजी सभापती पदासाठी निवडणूक होणार असून १८ सदस्य सहमती दर्शवून किंवा हात वर करून मतदानाचा हक्क बजावून सभापतीची निवड करतील. त्यावेळी समितीवर वर्चस्व कुणाचे हे सिद्ध होईल.
बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसचे ७, भाजप ६, भाजप बंडखोर अपक्ष २, व्यापारी २, हमाल मापाडी असे १८ सदस्य निवडून आले आहेत. बहुमतासाठी १० सदस्यांची गरज आहे. काँग्रेसला भाजपला मतांची गरज आहे. त्यांच्यासमोर मतांचा पर्याय आहे. ते वळवण्यासाठी सोमवारी सकाळी ११.३० ते दुपारी वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कॅनॉटमधील त्यांच्या दालनात बैठक घेऊन सदस्यांशी चर्चा केली. व्यापारी हमाल मापाडी सदस्यांचे मन वळवण्याचा जोरदार प्रयत्न करण्यात आला.

पण भाजप बंडखोर अपक्ष उमेदवारांचे मन वळवण्याचे फारसे प्रयत्न केले नाहीत. कारण काँग्रेसचेही मत फोडण्याचा डाव भाजप धुरंधरांनी आखल्याचे समजते. याची माहिती डॉ. काळे यांना कळताच त्यांनीही सायंकाळी ते रात्री उशिरापर्यंत जुना मोंढ्यातील कार्यालयात बैठक घेतली. अपक्ष उमेदवारांनाही फोनवर संपर्क साधून त्यांचे मत जाणून घेण्यात आले. एकूणच दोन्ही पक्षांकडून बाजार समितीवर सत्ता मिळवण्यासाठी व्यूहरचना आखण्यात आली आहे.

विजयासाठी प्रयत्न
त्याच्या विचारा बद्दल मी काहीच बोलणार नाही. पण आमच्या विचाराचा सभापती उपसभापती निवडण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. डॉ.कल्याण काळे, माजी आमदार, काँग्रेस.
सर्वांगिण विकासावर आमचा भर
बाजार समितीचा सर्वांगिण विकास करण्यावर आमचा भर राहणार आहे. तसा संकल्प विधानसभा अध्यक्षांनी केला आहे. त्याला सर्व सदस्यांचा पाठिंबा मिळणार आहे. त्यामध्ये काँग्रेस सदस्यांचाही समावेश आहे. बंडखोर दोन सदस्य पकडून आमचे 8 सदस्य असून आम्हाला व्यापारी हमाल मापाडी मिळून असे बहुमाताने भाजपचाच सभापती उपसभापती होईल. राजू शिंदे, माजी सभापती, जिकृउबास. भाजप.(नगरसेवक)


बहुमत सिद्ध झाले नाही तर आवाजी मतदान
बुधवारी सकाळी ११ वाजता सभापती उपसभापतीची निवड प्रक्रिया सुरू होईल. अर्ज भरल्यानंतर १८ सदस्यांनी सभापती उपसभापती सहमतीने ठरवले तर निवडणूक अधिकारी यांना ते मान्य असेल. बहुमत सिद्ध झाले नाही तर शेवटी हात वर करून मतदान घेतले जाईल. ज्याला सर्वाधिक मते मिळतील त्यांची सभापती उपसभापती पदावर वर्णी लागेल. श्रीरामसोन्ने, निवडणूक अधिकारी.