आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कृउबा’ निवडणुकीत काँग्रेसला सात जागा, बागडे यांना दुसरा धक्का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्हाकृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा निकाल सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जाहीर झाला. काँग्रेसला सर्वाधिक सात जागांवर विजय मिळाला असून भाजपचे सहा उमेदवार निवडून आले आहेत. भाजपने तिकीट नाकारलेले बंडखोरी करून अपक्ष लढलेले माजी सभापती संजय औताडे विकास दांडगे बहुमताने विजयी झाले. कुणालाच स्पष्ट बहुमत मिळालेले नसल्याने त्यांच्याच हाती समितीच्या सत्तेची चावी लागली आहे. व्यापारी मतदारसंघातून दोन आणि हमाल मापाडी एक अशा तीन उमेदवाराचा पाठिंबाही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सर्वच विजयी उमेदवारांचे गुलाल उधळून फटाक्याच्या अातषबाजीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.
बाजार समितीची सुमारे आठ वर्षानंतर निवडणूक झाली. काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे, लोकसभेत पराभूत झालेले विलास औताडे, भाजपचे आमदार तथा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्वतंत्र पॅनल उभे केले होते. उमेदवार ठरवण्यापासून ते निवडून आणण्यापर्यंतची रणनीती त्यांनी आखली होती. त्यामुळे सर्वच मतदारसंघात अटीतटीचा सामना झाला.

सहकारी संस्था मतदारसंघात ११ जागांपैकी भाजपने जागांवर विजय मिळवला. भाजपने तिकीट नारकलेले बंडखोर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेसला या मतदारसंघात जागा मिळाल्या. ग्रामपंचायत मतदारसंघात पैकी काँग्रेसला भाजपला जागा मिळाली. दोन्ही मिळून काँग्रेसला सात भाजपला सहा जागा मिळाल्या आहेत.
पुढील स्लाईडवर वाचा...
बातम्या आणखी आहेत...