आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत बँक व्यवस्थापकाची गळा चिरून निर्घृण हत्या: अज्ञात मारेकऱ्यांचा शोध सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगा यश सोबत जितेंद्र होळकर - Divya Marathi
मुलगा यश सोबत जितेंद्र होळकर
औरंगाबाद- अज्ञात मारेकार्‍याने जिल्हा मध्यवर्ती बँकेतील व्यवस्थापकाच्या घरात घुसून त्याची गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे. जितेंद्र नारायण होळकर वय 47(रा छत्रपतींनगर,सातारा परिसर) असे हत्या करण्यात आलेल्या बँक व्यवस्थापकाचे नाव आहे. मारेकर्‍याने होळकर यांचे दोन्ही हात दोरीने बांधून त्यांचा गळा चिरला. सातारा परिसरातील छत्रपती नगरात ही  धक्कादायक  घटना   आज (शनिवारी) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, होळकर हे पैठण तालुक्यातील शेकटा गावातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यांची पत्नी भाग्यश्री ह्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यालय प्रमुख आहेत. मुलगा यश नववीत  शाळेत आहे.

काल शुक्रवारी रात्री नित्यप्रमाणे होळकर यांनी पत्नी व मुलासोबत जेवण केले. नंतर ते बेडरूममध्ये टीव्ही पाहत होते. रात्री साडे अकराला यश त्याच्या खोलीत अभ्यासासाठी गेला. त्याच्या पाठोपाठ भाग्यश्री या देखील यशच्या खोलीत गेल्या आणि झोपल्या. रात्री 2 वाजेच्या दरम्यान काहीतरी आवाज येत असल्याने त्या जागी झाल्या. पाणी पिण्यासाठी जितेंद्र उठले असतील असे त्यांना वाटले. मात्र काही वेळाने गोंधळ सुरू झाला व जोरजोरात आरडाओरड सुरू झाली. त्यांनी खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र, मारेकर्‍याने यशच्या खोलीचा दरवाज्याला बाहेरून कडी लावून होती. त्यामुळे त्यांना बाहेर येता आले नाही. त्यांनी शेजारी राहाणारे पाठक यांना फोन केला. आणि घरात कोणी तरी घुसल्याचे सांगितले. पाठक यांच्यासोबत शेजारी राहाणारे काही लोक  होळकर यांच्या घरी आले. त्यांनी यशच्या खोलीचा दरवाजा उघडला. यश आणि भाग्यश्री या दोघांची सुटका केली. नंतर भाग्यश्री या धावत बेडरूमकडे गेल्या असता जितेंद्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. जितेंद्र यांचे हात दोरीने बांधलेले होते. त्यांचा गळा  चिरलेला होता. मारेकर्‍याने जितेंद्र यांच्या उजव्या हाताची बोट देखील कापली आहेत. 100 क्रमांक डायल करून पोलिसांना ही माहिती देण्यात आली. सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक काकडे यांनी कर्मचाऱ्यासह घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली.  जितेंद्र यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात हलवला आहे. सातारा पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र यांची हत्या कोणी व का केली हे अध्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही मात्र पोलीस विविध अंगाने तपास करून सर्व शक्यता तपासून पाहत आहेत
 
क्या है कितना है देदो....
हत्या झाली तेव्हा पत्नी भाग्यश्री आणि मयत जितेंद्र हे दोनी वेगवेगळ्या बेडरूममध्ये होते. त्यावेळी मारेकरी आणि जितेंद्र यांच्यात झटापट झाली तेव्हा मारेकरी क्या है कितना है देदो, असे बोलत होते, अशी माहिती भाग्यश्री यांनी पोलिसांना दिली.

मात्र घरातील कोणताही सामान अस्ताव्यस्त नाही किंवा घरातून सोने, चांदी, रोकड अशी कोणतीही मौल्यवान वस्तू चोरीला गेलेले नाही. त्यामुळे मारेकरी हत्या करण्याच्या उद्देशाने आले होते का मग चोरीच्या? असा संभ्रम निर्माण झाला आहे.

मारेकरी एक पेक्षा अधिक....
एकट्या मारेकर्‍याने अशाप्रकारे हत्या करणे शक्य नाही. मारेकरी एक पेक्षा अधिक असण्याची शक्यता असून जितेंद्र यांची कोणी व कोणत्या कारणासाठी हत्या केली याचा शोध सध्या सुरू आहे
- सुशिला खरात
उप पोलिस निरीक्षक(तपास अधिकारी)


पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित घटनेचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...