आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर, गंगापूर, कन्नड, पैठण, खुलताबादला दिवाळी जोरात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, कन्नड, खुलताबाद आणि पैठण या पाच नगर परिषदांची निवडणूक पुढील महिन्यात होत आहे. नगराध्यक्ष तसेच नगरसेवक होण्यास इच्छुकांनी आतापासूनच प्रचार सुरू केल्याने या पाचही ठिकाणी दिवाळी जोरात असणार आहे. नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याने जो नगराध्यक्ष होण्यासाठी इच्छुक आहे, त्याच्यावर दिवाळीची मोठी जबाबदारी असणार आहे.
दिवाळीपूर्वीच या नगर परिषदांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले. मात्र त्याआधीपासूनच इच्छूक कामाला लागले होते. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर पुढे नगराध्यक्ष, उपनराध्यक्षाचे बघू, असे आतापर्यंतचे समीकरण होते. या पदासाठी आरक्षण कोणते त्यानुसार वार्डावरही लक्ष असायचे. त्या वार्डातून विजयी होण्यासाठी धडपड असायची. परंतु आता नगरसेवकांतून नगराध्यक्ष निवडला जाणार नसल्यामुळे नगरसेवक झाल्यानंतर पुढची फिल्डिंग लावण्याचा प्रश्नच नाही. परिणामी, सारी मदार ही नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्यांवर राहणार आहे.
नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराकडून नगरसेवकासाठीच्या उमेदवारांना रसद पुरवली जाणार हे उघड आहे. कारण मतदार एकाच वेळी दोन मतदान करणार आहेत. तेव्हा संबंधित उमेदवाराने नगराध्यक्षपदाचे मतही वळवावे, यासाठी इच्छुकाला खटाटोप करावा लागणार आहे. या सर्व बाबींची माहिती असल्याने अजून कोणत्याही पक्षाकडून अधिकृतपणे उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. प्रत्यक्षात अनेकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेकांना दिवाळीच्या खर्चाचा वांधा नसेल. दिवाळी संपल्यानंतर सर्व पक्षांचे उमेदवार अधिकृतपणे जाहीर होतील आणि प्रचाराचा धुराळाही उडेल. अजून आघाडी, युतीचे धोरणही जाहीर झालेले नाही. तरीही काहींनी नगराध्यक्ष होण्यासाठी आतापासून प्रयत्न चालवले आहेत. पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर ठीक, अन्यथा अपक्ष म्हणून लढण्याची तयारीही या पाच ठिकाणी काहींनी चालवल्याने प्रचार सुरू होण्यापूर्वीच चर्चां रंगली आहे.

पाचही ठिकाणी निवडणूक लढणार
गेल्या काही दिवसांपासून उमेदवारांची चाचपणी करण्यात येत होती. प्रारंभी उमेदवारांची वानवा होती. परंतु आता चित्र बदलले असून नगराध्यक्षपद तसेच नगरसेवकपदांसाठीही मनसेकडे उमेदवारांनी मागणी केल्याचे जिल्हाप्रमुख दांगोडे यांनी सांगितले. चांगले चेहरे पक्षाकडे असून आम्ही पाचही ठिकाणी लढू, असे त्यांनी स्पष्ट केले. दिवाळीमुळे पक्षाने उमेदवारांच्या मुलाखती तसेच मेळावे थांबवले असून दिवाळीनंतर पाचही ठिकाणी पक्षाचे मेळावे होतील. त्यानंतर उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.

पक्षाची ताकद दाखवून देऊ : पदाधिकाऱ्यांचा दावा
गेल्या तीन निवडणुकाच लढल्याने या पक्षाचे राजकीय बळच दिसत नाही. या पक्षाला आता दोन निवडणुकांच्या रुपाने चांगली संधी चालून आली आहे. नगर परिषदांच्या निवडणुकांबरोबरच जिल्हा परिषदेचीही निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत त्यांना कितपत यश मिळते, यावर त्यांचे बळ निश्चित होईल. या निवडणुकीत बऱ्यापैकी यश मिळाले तर कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळू शकते. येत्या निवडणुकांतून पक्षाची ताकद दाखवून दिली जाईल, असा दावा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
बातम्या आणखी आहेत...