आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि. प. अध्यक्षांसह ८७ टक्के सदस्यांची बैठकीला दांडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विकासाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना सक्षम करणे योग्य दिशा देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांसाठी आमचं गाव आमचा विकास उपक्रमांतर्गत बैठक घेऊन प्रशिक्षितांमार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यानुसार शुक्रवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला अवघ्या १३ सदस्यांची उपस्थिती होती. अध्यक्षांसह ४७ सदस्यांनी दांडी मारली. यावरून ग्रामविकासाबाबत सदस्य किती गंभीर आहेत, याची प्रचिती येत असल्याची चर्चा जिल्हा परिषद परिसरात सुरू होती.
पूर्वी ग्रामपंचायतीला ३० टक्के, पंचायत समिती जिल्हा परिषदेमार्फत ७० टक्के निधी मिळत असे. मात्र, चौदाव्या वित्त आयोगाच्या वतीने ग्रामपंचायतींना शाश्वत विकास करण्यासाठी आर्थिक स्वायत्तता देण्यात आली आहे. त्याअंतर्गत जिल्ह्याला ५४ कोटी रुपये मिळाले आहेत.
ते दोन टप्प्यांत ग्रामपंचायतींच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात आले. प्रत्येक
ग्रामपंचायतीला वर्षभरात अडीच लाख रुपये मिळाले आहेत. पाच वर्षांचा विकास आराखडा तयार करण्यात आला अाहे. २०१५ ते २०२० या काळासाठी राज्याला १५ हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. ग्रामपंचायतींची लोकसंख्या क्षेत्रफळाच्या निकषांवर थेट निधी उपलब्ध करून दिला जात आहे. गरजा त्यानुसार शाश्वत विकास करण्यासाठी बैठका, कार्यशाळा घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये अधिकाऱ्यांबरोबरच जि. प. अध्यक्ष, सदस्य, पंचायत समिती, ग्रामपंचायत समितीचे सर्व सदस्य, लोकप्रतिनिधी लोकसहभाग वाढवायचा आहे. त्यांना प्रशिक्षित करायचे आहे. त्यासाठी जि. प. प्रशासनाच्या वतीने सर्वांना पत्र पाठवून फोनवर माहिती देऊन २४ जूनच्या बैठकीसंदर्भात कळवून उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. तरीदेखील ८७ टक्के सदस्यांनी दांडी मारली, हे विशेष.

ज्यांच्यावर जबाबदारी तेच गैरहजर
उद्दिष्टसाकार करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेच गैरहजर राहिले तर विकास कसा होणार, असा प्रश्न प्रशासन सुज्ञ नागरिकांच्या वतीने उपस्थित केला जात आहे. बैठकीला उपाध्यक्ष दिनकर पवार, बांधकाम वित्त विभागाचे सभापती संतोष जाधव, दीपक राजपूत, मनाजी मिसाळ यांच्यासह १३ सदस्य अधिकारी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...