आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: लाडसावंगीचे केंद्रप्रमुख बदलले, विद्यार्थ्यांना सुविधाही मिळणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद  - लाडसावंगी येथील जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रांची चौकशी करण्यात येणार आहे.  येथील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी फर्निचरची सुविधा पुरवण्यात येईल, अशी माहिती बोर्डाने दिली. ‘दिव्य मराठी’ने ‘दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डानेच दिली खुलेआम नकलांची मुभा’ या मथळ्याखाली ८ मार्च रोजी वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल बोर्डाने घेतली अाहे. 

मंगळवारी दहावीच्या  परीक्षेच्या पहिल्याच दिवशी या केंद्रावर राजरोसपणे कॉपी सुरू होती. विद्यार्थी खाली बसून घोळक्याने पेपर लिहीत होते. श्रीमती बीडकर यांची केंद्रप्रमुख म्हणून नेमणूक केली. काॅपीमुक्तीसाठी पोलिस बंदोबस्त दिल्याचे माध्यमिक  शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...