आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाधव यांनी आघाडी, मनसेला तारले, गणतीत नसलेला सदस्य थेट बांधकाम सभापती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- संख्याबळ जास्त असतानाही जिल्हा परिषदेमध्ये सत्ता येईल की नाही, अशा संभ्रमात आघाडीचे सदस्य होते, तर दुसरीकडे चत्मकार घडून युतीचा झेंडा जि.प.वर फडकेल, अशी आशा युतीच्या सदस्यांना होती; परंतु ऐनवेळी मनसेचे जि.प.तील नाराज सदस्य संतोष जाधव यांनी पाच सदस्यांना आघाडीच्या बाजूने उभे केल्यामुळे जि.प.मध्ये आघाडीची सत्ता कायम राहिली. याचेच बक्षीस म्हणून जाधव यांना थेट बांधकाम सभापतिपद देण्यात आले.
आघाडीच्या कारभारला सत्तेमधीलच सदस्य कंटाळले होते. तसेच आमदार प्रशांत बंब यांच्या गटाच्या दोन अपक्ष सदस्यांनीही आघाडी सोडून थेट युतीच्या गोटात गेले होते. मनसेचे तीन सदस्य युतीकडे जाणार होते. त्यामुळे युतीचे संख्याबळ २९ होते. तसेच आघाडीचे दोन ते तीन नाराज सदस्य युतीच्या गळाला लागलेही असते. तत्पूर्वी मनसेच्या पाच सदस्यांना संतोष जाधव यांनी सहलीला नेऊन आघाडीला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे उर्वरित तीन सदस्यांनीही आपले मत आघाडीला दिले. मनसेमध्ये सदस्य म्हणून जाधव यांना फारसे विचारले जात नव्हते; पण त्यांनी नाराज सदस्यांना आघाडीकडे वळवल्यामुळे मनसेच्या गटातही त्यांचे वजन वाढले आहे.
पाच सदस्यांचा खंबीर पाठिंबा
सभापतिपदाची निवड बुधवारी करण्यात आली. यात जाधव यांना पूर्वी एकही पद मिळणार नव्हते. मात्र, पाच सदस्यांचा खंबीर पाठिंबा असल्याने त्यांना थेट बांधकाम सभापतिपदाची व अन्य एका सदस्याला आणखी एक सभापतिपद देण्याची मागणी केली होती. त्यानुसार मनसेच्या शीला चव्हाण यांना समाजकल्याण सभापतिपद मिळाले.