आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात 385 मिलिमीटर पर्जन्य, त्र्यंबकेश्वर मंदिरातून जणू अवतरली गंगा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोरदार पावसामुळे त्र्यंबकेश्वर मदिरातून गंगा अवतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. - Divya Marathi
जोरदार पावसामुळे त्र्यंबकेश्वर मदिरातून गंगा अवतरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
नाशिकरोड- जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये रविवारी मध्यरात्रीपासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. परिणामी पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे गंगापूर, दारणा, वालदेवी, भावली या धरणांमधून पाणी साेडण्यात येत अाहे. रविवारी रात्री वाजता गंगापूर धरणातून हजार ५४२, तर दारणातून १० हजार १६० क्सुसेक विसर्ग सुरु होता. त्यामुळे गोदावरीला पूर आल्याने जिल्हा प्रशासनाने नदी किनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले अाहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात रविवारी पावसाची दिवसभरातील नाेंद २८५ मिलिमीटर झाली अाहे.
 
दक्षिण पूर्व विदर्भ, उदयपूर, इंदूर आणि पश्चिम बंगाल या परिसरात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून त्यानुसार नाशिक जिल्हयात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, सिन्नर, सुरगाणा, कळवण, नांदगाव, पेठ, दिंडोरी तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. देवळा, चांदवड, येवला, निफाड, मालेगाव, सटाणा तालुक्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस आहे. आॅगस्टमध्ये ओढ दिल्याने येवला, सिन्नर, निफाड, नांदगाव, देवळा आणि चांदवड तालुक्यातील पीकांसाठी पाणी टंचाई जाणवेल, अशी चिन्हे हाेती. मात्र जिल्हयात सर्वत्र पर्जन्य पुनरागमन झाल्यामुळे खरिपांच्या पिकांना या पावसाचा लाभ होणार आहे. मात्र इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा आणि नाशिक तालुक्यात मध्यम स्वरुपाच्या पावसामुळे भाताच्या पिकांचे नुकसान हाेण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 
नांदूरमध्यमेश्वरमधून १५,६६५ क्सुसेकचा विसर्ग
गंगापूरआणि दारणा धरणातून विसर्ग सुरु असल्याने चांदोरी, सायखेडा या गावाजवळ गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे.त्यामुळे नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातुन सांयकाळी पाच वाजता १५ हजार ७७५ क्सुसेकचा विसर्ग सुरु होता. 

विसर्ग असा (क्सुसेक)
दारणा - १०,१६० 
गंगापूर - ७,५४२ 
कादवा - ३८८ 
वालदेवी - १०५० 
पुनद - ५५० 

दाेन ते तीन दिवस पावसाचा अंदाज 
विदर्भ, इंदूर,उदयपूर यासह मध्यप्रदेशातील काही परिसरावर हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.त्यामुळे दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 
बातम्या आणखी आहेत...