आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यातील ४६२ मशिदींची माहिती मिळवा अॅपवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यातील ४६२ मशिदींच्या माहितीचे अॅप ‘मसाजीद औरंगाबाद’ या नावाने तयार करण्यात आले आहे. अॅपवर प्रत्येक मशिदीचे नाव, पत्ता, अध्यक्षाचे नाव, मोबाइल क्रमांक अशी संपूर्ण माहिती असणार आहे. हे अॅप तीन मित्रांनी तयार केले असून त्यासाठी माॅयनॉरिटीज वेल्फेअर अँड अपलिफ्टमेंट ट्रस्टने त्यांना सहकार्य केले आहे.
शहरात काही दिवसांपूर्वी महापालिकेने अधिकृत धार्मिक स्थळांना अनधिकृत म्हणून घोषित केले होते. त्यामुळे समाजात नाराजी पसरली होती. याची दखल घेत माॅयनॉरिटीच वेलफेअर अॅण्ड अपलिफ्टमेंट ट्रस्टच्या सदस्यांनी सर्व मशिदींची माहिती संकलित करून अॅपवर एक पेज तयार केले आहे. मशिदींविषयी कोणाला माहिती द्यायची असेल तर त्यांना या अॅपवर ती टाकण्यासाठी पेजची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अॅप उपयुक्त ठरेल : मशिदींच्यामाहितीसाठी अॅपचा चांगला फायदा होईल. यासाठी आमच्या ट्रस्टने संपूर्ण माहिती गोळा करून हा अॅप तयार करण्यासाठी मदत केली. इतर मशिदींचाही यामध्ये समाविष्ट करण्यात येईल, असे मायनॉरिटीज वेल्फेअर ट्रस्टचे सेक्रेटरी नासेर खान यांनी सांगितले.

चांगले अॅप तयार करू
^२०१३मध्ये तयार केलेल्या रमजानच्या अॅपला दोन लाख लोकांनी डाऊनलोड केले होते. भविष्यातही चांगले अॅप तयार करू. अब्दुलबासीत, अॅप तयार करणारा तरुण
तरुणांनी तयार केलेले अॅप.

यांनी तयार केले अॅप
अब्दुलबासीत, शेख मोबीन आणि अलिम सिद्दिकी या मित्रांनी अॅप तयार केले. यापूर्वीही रमजानचे अॅपही यांनीच तयार केले होते.
बातम्या आणखी आहेत...