आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी इम्पॅक्ट: सीएसआरसाठी जिल्हाधिकारी घेणार ११ जून रोजी बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जलयुक्त शिवार योजनेसाठी सीएसआरच्या माध्यमातून निधी मिळावा यासाठी उद्योजकांनी आतापर्यंत फक्त आश्वासने दिली. मात्र, एक छदामदेखील िदलेला नाही. याबाबत "दिव्य मराठी'ने गुरुवारी वृत्त प्रकाशित केले होते. आता ११ जूनला एनजीओ, उद्योजक तसेच बजाज समूहाची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांनी दिली.

जलयुक्त शिवारसाठी औरंगाबादच्या उद्योजकांनी सीएसआरच्या माध्यमातून पैसे देण्याच्या घोषणा केल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात सीएसआरच्या माध्यमातून मिळालेल्या अडीच कोटींपैकी एक कोटी रुपये मुंबईच्या सिद्धिविनायक ट्रस्ट आणि एक कोटी रुपये शिर्डी संस्थानने दिले आहेत. औरंगाबादच्या उद्योजकांनी जलयुक्त शिवार योजनेसाठी पैसे दिले नाहीत. त्यामुळे आता हा निधी मिळावा यासाठी ही बैठक घेण्यात येणार आहे.
११ जून रोजी कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये सायंकाळी ४.३० वाजता जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली आहे. यात एनजीओ, बजाज उद्योग समूहासह इतर उद्योजकांना बोलावण्यात आले आहे. प्रशासन पाठपुरावा करत नसल्याचा दावा उद्योजकांनी केला होता. मात्र प्रशासनाच्या वतीने सीएसआरमधून निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांनी सांगितले. सीएसआरचा निधी कुठे आणि कशा पद्धतीने वापरता येईल, याचे नियोजन करण्यात येणार आहे. दरम्यान, पावसाळा तोंडावर आल्यामुळे जलयुक्त शिवारच्या कामांची वेळ आता संपत आली तरी ही योजना पुढच्या वर्षीदेखील चालू राहणार आहे.