आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्याचे राजकारणात तिसर्‍या आघाडीचा पर्याय ठरेल उत्तम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - केंद्रीय पातळीवर तिसर्‍या आघाडीची सुरू असलेली चर्चा औरंगाबादचे राजकारण बदलू शकते, असा दावा स्थानिक डाव्या नि उजव्या पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. सध्या फक्त चर्चाच सुरू असल्याने अधिक भाष्य करणे योग्य नसल्याचे सांगतानाच तिसरी आघाडी औरंगाबाद जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलू शकते, असाही दावा करण्यात आला आहे.

केंद्र सरकारमध्ये तिसर्‍या आघाडीची चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नेत्यांची मते जाणून घेतली असता योग्य पद्धतीने सर्वजण एकवटले तर तिसरी आघाडी हा उत्तम पर्याय ठरू शकतो, असा विश्वास शहरातील मंडळींनी व्यक्त केला.


विजयासाठी प्रयत्न करू
औरंगाबादसह जालन्यातून तिसर्‍या आघाडीला अजून संधी मिळालेली नाही. मात्र, आम्ही सर्वांना बरोबर घेऊन येथून विजय मिळवण्याचा प्रयत्न करू. राष्ट्रवादीलाही सोबत घेण्याचा प्रयत्न राहील. खासदार नि आमदारही निवडून येतील असा अंदाज आहे. पंतप्रधान होण्यासाठी खासदार देण्याची गरज ओळखून आहोत. कुंजबिहारी अग्रवाल, प्रदेश उपाध्यक्ष, समाजवादी पार्टी


तिसर्‍या आघाडीसाठी चित्र समाधानकारक नाही. मात्र, सर्वजण एकत्र आल्यास औरंगाबादचे राजकारण बदलू शकते. काँग्रेस आणि भाजपच्या तंबूला कंटाळलेले मतदार या आघाडीकडे वळू शकतील. आघाडीला येथे खाते खोलता येईल. अजमल खान, जनता दल


तिसर्‍या आघाडीची सध्या चर्चाच आहे. वर निर्णय होईल त्यानुसार आम्ही पुढे काम करू. राज्यपातळीवरील पक्ष सोबत घेण्याची चर्चा सुरू आहे. आघाडी कशी गठित होते यावर औरंगाबाद येथील जय-पराजय अवलंबून आहे. सर्वांनी ताकद लावली, फाटाफूट झाली नाही, तर आम्ही जबरदस्त टक्कर देऊ. तसा इतिहास आहे. प्रा. राम बाहेती
प्रामाणिक प्रयत्न झाल्यास तिसर्‍या आघाडीला संधी आहे. सामान्यांवर होणारा अन्याय याविरोधात आतापासूनच प्रयत्न झाले तर काहीही शक्य आहे. तिसर्‍या आघाडीच्या नेतृत्वासाठी काही विश्वासार्ह माणसे आहेत. सुभाष लोमटे, समाजवादी जन परिषद