आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्तालयात रंगरंगोटी; जुने कार्पेट, पडदे बदलले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मंत्रिमंडळ बैठकीसाठी विभागीय आयुक्तालयात लगबग सुरू आहे. 4 ऑक्टोबरला होणाऱ्या बैठकीसाठी मुख्य प्रशासकीय इमारतीसह सर्वच इमारतींची रंगरंगोटी सुरू आहे. विभागीय आयुक्तांच्या दालनासह महत्त्वाच्या दालनांची साफसफाई सुरू आहे. त्यामुळे आयुक्तांचे दालन आज बंद होते. या दालनात मुख्यमंत्री आणि राज्यपालांची तसबीर लावली जाणार आहे. आयुक्त उमाकांत दांगट हे महसूल उपायुक्तांच्या दालनात बसून कामकाज पाहत होते. संपूर्ण परिसरात मोठा पेंडॉल टाकण्यात येत असून झाडून सर्वच अधिकारी मंत्र्यांच्या स्वागताच्या तयारीत गुंतले होते.

4 ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन औरंगाबादेत खास मराठवाड्याच्या प्रश्नांवर बैठक घेणार आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात सलग तीन वेळा बैठक झाली. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा ही बैठक झाली नाही, मात्र अशोक चव्हाण मुख्यमंत्री होताच त्यांनी २००८ मध्ये १७ व १८ सप्टेंबरला बैठक घेतली. त्यानंतर तब्बल आठ वर्षांनी ही बैठक होत आहे. त्यामुळे नागरिकांसह सर्वच अधिकाऱ्यांतही अपूर्व उत्साह आहे. मुख्यमंत्री मराठवाड्याला काय देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दालनातील कार्पेट बदलले
विभागीय आयुक्तांच्या दालनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तसबिरी आहेत. समोरच्याच भिंतीवर राज्यपाल विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो बसवण्याचे काम सुरू आहे. या दालनातील जुने कार्पेट बदलण्यात आले. खुर्च्या, भिंती यांची रंगसंगती लक्षात घेऊन कार्पेटचा रंग आयुक्तांनी चॉइस केला. मुख्य प्रशासकीय इमारतीला रंग देण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू आहे.

सुभेदारीची सफाई
मंत्र्यांची राहण्याची व्यवस्था सुभेदारी विश्रामगृहात असल्याने तेथेही लगीनघाई सुरू आहे. साफसफाई, पडदे, कार्पेट बदलण्याचे काम सुरू आहे. आयुक्तालयातील सर्वच कर्मचारी विषय समित्यांत गुंतलेले दिसले.
छायाचित्र: विभागीय आयुक्त कार्यालयात रंगरंगोटीचे काम सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...