आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतक-यांचे दस्तावेज ऑनलाइन करणार- विभागीय आयुक्त उमाकांत दांगट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट आहे. यावर कायमस्वरुपी उपाययोजना कराव्या लागतील. विभागीय आयुक्त म्हणून हे माझे कर्तव्य आहे. येत्या पाच वर्षांत जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.
त्यात मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याची जबाबदारी माझी आहे. त्यानुसार मी काम करेनच. याचबरोबर मी विभागाचा महसुली विभागीय प्रमुख आहे. एखाद्या सातबा-यावर काही त्रुटी राहिली तर शेतकरी त्रस्त होतो. कोर्ट-कचे-या कराव्या लागतात. असे पुढे होऊ नये म्हणून अभिलेखांवरही विशेष लक्ष देण्याचे मी ठरवले आहे, असे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी सांगितले.
बुधवारी त्यांनी मावळते आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडून पदभार स्वीकारला. या प्रसंगी ते बोलत होते. मावळते विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी सायंकाळी नवे आयुक्त उमाकांत दांगट यांच्याकडे आयुक्तपदाचा भार सोपवला. या प्रसंगी दांगट यांना खुर्ची देऊन जयस्वाल हसतमुखाने बाजूला सरकले.