आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभागस्तरीय सिद्धा महोत्सव आजपासून, उद्घाटन व बचत गटांना पुरस्कार वितरण आज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून औरंगाबादेतील जिल्हा परिषद मैदानावर २ ते ८ मार्चदरम्यान “सिद्धा महोत्सव २०१६-१७’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे २ मार्च रोजी ग्रामविकास मंत्री पंकजा पालवे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता उद्घाटन होईल. 
 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे हे राहतील, तर प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री रामदास कदम, राज्यमंत्री दादाजी भुसे, राज्यसभा सदस्य राजकुमार धूत, लोकसभा सदस्य चंद्रकांत खैरे, रावसाहेब दानवे, विधान परिषद सदस्य विक्रम काळे, सतीश चव्हाण, सुभाष झांबड, विधानसभा सदस्य सय्यद इम्तियाज जलील, संजय शिरसाट, अतुल सावे, अब्दुल सत्तार, प्रशांत बंब, हर्षवर्धन जाधव, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, संदिपान भुमरे  उपस्थित राहतील, तर मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, संतोष जाधव, विनोद तांबे, दिनकर पवार, शीलाबाई चव्हाण, सरला मनगटे आदी मान्यवर उपस्थित राहतील. 

यादरम्यान जिल्हा व विभागीय स्तरीय राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार महिला बचत गटांना मान्यवरांच्या हस्ते वितरित केले जाणार आहेत. या महोत्सवात ग्रामीण महिला स्वयंसहायता गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केली जाणार आहे. यात औरंगाबाद ८४, बीड ३४, जालना २८, हिंगोली १५, परभणी २७, लातूर ३०, उस्मानाबाद २१, नांदेड २३ असे मराठवाड्यातून २६५, तर अन्य विभागांतून १२ असे २७१ महिला स्वयंसहायता गट सहभागी होणार आहेत.
 
यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण महिलांनी स्वयंसहायता गटांद्वारे उत्पादित केलेल्या मराठमोळ्या वस्तू, हस्तकलेच्या वस्तू, रानमेवा, विविध खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तू, ज्वेलरी, रेडिमेड गारमेंट्स, गृहोपयोगी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत दररोज सुरू राहील. याशिवाय दररोज सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन  प्रकल्प संचालक सुरेश बेदमुथा, उपआयुक्त (विकास) सूर्यकांत हजारे यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...