आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य एज्युकेशन अँड करिअर फेअरचा शुभारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विविध क्षेत्रांतील करिअर निवडीसाठी होणाऱ्या स्पर्धा असोत किंवा शैक्षणिक प्रवेशासाठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षा असोत, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर शिक्षण हीच यशाची किल्ली आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य शिक्षण, प्रशिक्षण अन् करिअरची निवड करणे आवश्यक आहे, असे मत रेसाेनन्स प्रस्तुत 'दिव्य एज्युकेशन अँड करिअर फेअर'च्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले. शुक्रवारी या तीनदिवसीय फेअरचे थाटात उद्घाटन करण्यात आले.

या वेळी 'दिव्य मराठी'चे सीओओ निशित जैन, स्टेट एडिटर प्रशांत दीक्षित, निवासी संपादक दीपक पटवे, जनरल मॅनेजर (स्पेशल प्रोजेक्ट) परमजितसिंग संधू, एचआर स्टेट हेड निशिकांत तायडे, युनिट हेड अमित डिक्कर, रेसाेनन्सचे जयंत रॉय, जिसाज लिटिल प्लॅनेटचे अभिजित छाजेड, ग्लोबल डिस्कव्हरी स्कूलचे अमोल कांचर, टेलिसॉफ्ट सर्व्हिसेस प्रा.लि.चे बिनू मॅथ्यू आदींची उपस्थिती होती. बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करणे ही काळाची गरज आहे, असे मत अभिजित छाजेड, जयंत रॉय यांनी व्यक्त केले, तर विकासासाठी संधी अनेक आहेत. त्या उपलब्ध करून देणे हा या फेअरचा उद्देश आहे, असे मत दीपक पटवे यांनी मांडले. शिक्षण हीच यशाची किल्ली असल्याचे राज्य संपादक प्रशांत दीक्षित यांनी सांगितले. एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांना सर्व माहिती उपलब्ध झाल्यास पर्याय निवडणे सोपे होते. या उद्देशानेच आम्ही अशा उपक्रमांचे आयोजन करतो, अशी भूमिका निशित जैन यांनी मांडली.

या वेळी दिव्य मराठीचे जनसंपर्क अधिकारी विकास लोळगे, स्टेट फायनान्स हेड अजय पणिकर, स्टेट रिस्पॉन्स हेड अभिजित दासगुप्ता, एसएमडीचे मुख्य व्यवस्थापक भालचंद्र चौधरी, मुख्य जाहिरात व्यवस्थापक नौशाद शेख, एचआर मॅनेजर अजित पती यांची उपस्थिती होती. स्टेट हेड एज्युकेशन बाळासाहेब खवले यांनी आभार मानले. सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत विद्यार्थी आणि पालकांनी या एज्युकेशन फेअरचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

फेअरमध्ये २१ स्टॉल्स
प्रोझोन मॉल येथे २२ ते २४ मेदरम्यान हे एज्युकेशन फेअर होत असून यात एकूण २१ स्टॉल लावण्यात आले आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला एकाच छताखाली करिअरच्या तसेच विविध अभ्यासक्रमांबाबत विद्यार्थी आणि पालकांना माहिती दिली जात आहे. नामांकित शिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रम, नोकरीच्या संधींविषयी येथे माहिती घेता येईल. या एज्युकेशन फेअरचे मुख्य प्रायोजक रेसाेनन्स असून सहप्रायोजक म्हणून इन्स्टिट्यूट ऑफ टॅली, ग्लोबल डिस्कव्हरी स्कूल, जैन इंटरनॅशनल स्कूलचे सहकार्य मिळत आहे.
बातम्या आणखी आहेत...