आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Education And Career Fair,Latest News In Divya Marathi

दिव्य एज्युकेशन अँड करिअर फेअरचा शुभारंभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद -औरंगाबाद शहर शिक्षणात पुढे असून, मुलांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. विविध क्षेत्रांकडे तरुणांचा वाढता कल आणि शहरातच या सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध होत असल्याने औरंगाबाद शहर लवकरच शैक्षणिक हब म्हणून नावारूपास येईल, असे मत शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले.
‘दैनिक दिव्य मराठी’च्या वतीने आकाशवाणी जवळील मोतीवाला स्क्वेअर येथे शुक्रवारपासून ‘दिव्य एज्युकेशन अँँड करिअर फेअर 2014’ चे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणार्‍या या फेअरचे उद्घाटन नारायणा इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. एम. एफ. मल्लिक आणि नाथ व्हॅली स्कूलचे प्राचार्य प्रा.रणजित दास यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी युनिव्हर्सल कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, नाशिकचे चैतन्य गोस्वामी, ‘दिव्य मराठी’चे स्टेट एडिटर प्रशांत दीक्षित, बिझनेस हेड निशित जैन, ‘दिव्य मराठी’चे जनरल मॅनेजर (स्पेशल प्रोजेक्ट) परमजितसिंग संधू, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी र्शीकांत देशमुख, गणेश डोंगरे, प्रा.अमोल बावीस्कर, युनिव्हर्सल ग्रुपचे जनरल मॅनेजर राजेश मोहिले, जाहिरात विभागाचे मुख्य व्यवस्थापक सुभाष बोंद्रे, उपव्यवस्थापक बाळासाहेब खवले, दिलीप डिघोळे, नरेंद्रसिंग सोळंकी, रवी सलखोटिया यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी केले. ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक दीपक पटवे यांनी आभार मानले.
आजचे कार्यक्रम

अभियांत्रिकी शाखेची निवड विषयावर सायंकाळी 6:30 वाजता युनिव्हर्सल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वसईचे प्रो. अमोल बावीस्कर यांचे व्याख्यान होणार आहे. तर सायंकाळी 7:30 वाजता विधी क्षेत्रातील करिअर संधी विषयावर लॉर्डस् युनिव्हर्सल कॉलेज ऑफ लॉ मुंबई येथील तनिका गांधी मार्गदर्शन करतील.
शहराचे नाव देशपातळीवर
डॉ.मल्लिक म्हणाले की, शिक्षणात औरंगाबाद शहराचे नाव आता देशपातळीवर पुढे येत आहे. त्यामुळे येथे शैक्षणिक हब होत आहे. मुलांमध्ये गुणवत्ता खूप आहे. त्यांना प्रोत्साहन गरज आहे.
दिशा निवडा : डॉ.श्रीकांत देशमुख
करिअर फेअरमुळे संधी आणि विषयांची निवड करण्याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. करिअर फेअरची विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही मदत होईल. विद्यार्थ्यांची मानसिकता आणि कल ओळखूनच त्याला दिशा निवडण्यासाठी मार्गदर्शन करावे, असे मत डॉ.श्रीकांत देशमुख म्हणाले.
शॉर्टकट नाही : प्राचार्य रणजित दास
शिक्षण हे सामाजिक कार्य आहे. त्याचे बाजारीकरण होता कामा नये. आज शिक्षण आणि करिअर यात अनेक पर्याय आहेत. परंतु आपल्यासाठी योग्य पर्याय कोणता याची माहिती विद्यार्थ्यांना करून देणे आवश्यक आहे. यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट कामा येत नाही. त्यासाठी मेहनत आणि पर्शिम घ्यावे लागतात, असे मत प्राचार्य रणजित दास यांनी व्यक्त केले.
प्रश्नच विचारा : प्रा. चैतन्य गोस्वामी
आज शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. त्यामुळे विश्वास कुणावर ठेवावा, असा विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो. कुणावरही विश्वास ठेवू नका. पण विचार करा, शिक्षणाच्या संधीची माहिती घ्या, असा सल्ला प्रा. चैतन्य गोस्वामी यांनी दिला.