आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य गणेश 2013’: divyamarathi.com वर जिंका 30 हजारांपर्यंतची बक्षिसे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दैनिक दिव्य मराठी’ च्या divyamarathi.com या संकेतस्थळावर गणेश भक्तांसाठी विशेष दालन सुरू करण्यात आले आहे. यासोबतच घरगुती गणेशमूर्ती आणि आरासाची छायाचित्र स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. यात यशस्वी ठरणार्‍या तीन स्पर्धकांना 30 हजार रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.

divyamarathi.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून सणासुदीला विशेष बातम्या, लेखांची वैचारिक मेजवानी दिली जाते. यंदाच्या गणेशोत्सवात या संकेतस्थळावर ‘दिव्य गणेश 2013’ हे स्वतंत्र सेक्शन सुरू करण्यात आले आहे. गणेशोत्सव केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे घराघरात हा उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. हाच धागा पकडत गणेशोत्सवाचे मांगल्य संकेतस्थळावर आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.

divyamarathi.com च्या ‘दिव्य गणेश 2013’ या सेक्शनमध्ये ‘महाराष्ट्रातील दिव्य गणेश, ‘देश-विदेश’, ‘धार्मिक विधी’, ‘सेलिब्रिटी’, ‘रसास्वाद’ आणि ‘फोटो फीचर’ असे विविध उपविभाग सादर करण्यात आले आहेत. यात दररोज विशेष बातम्या, लेख अपडेट केले जातील. तर ‘दिव्य गणेश 2013’ या सेक्शनला फोटो फ्लिकरची सुविधा असून त्यात नित्यनवीन घडामोडी छायाचित्रांच्या माध्यमातून अधोरेखित केल्या जाणार आहेत.

तसेच divyamarathi.com या संकेतस्थळावर गणेशमूर्ती आणि आरासाची छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या उत्सवात आपल्या घरी प्रतिष्ठापणा केलेल्या गणेशमूर्ती आणि आरासाची छायाचित्रे या ठिकाणी अपलोड करता येईल. ही छायाचित्र इतर वाचकांनाही पाहण्यास मिळणार आहेत. विशेष म्हणजे यातील तीन ‘बेस्ट’ छायाचित्रांची निवड केली जाणार असून विजेत्यांना प्रत्येकी 5 हजार, 10 हजार आणि 15 हजारांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. तेव्हा, divyamarathi.com या संकेतस्थळाला भेट द्या, स्पर्धेत सहभागी व्हा आणि जिंका रोख बक्षिसे.