आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शब्द, सुमने आणि विश्वासाचा सोहळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वाचकांच्या विश्वासाची चार वर्षे पूर्ण करणाऱ्या "दिव्य मराठी'चा वर्धापन दिन सोहळा शुक्रवारी पार पडला. राजकीय सामना रंगवणारे अनेक नेते, विविध क्षेत्रांतील मातब्बर सायंकाळच्या रम्य वातावरणात गप्पा आणि हास्यकल्लोळात काही क्षण विसावले. निर्भीडता, नि:पक्षतेसोबतच वाचकांसाठी माहितीचे वेगळे जग खुले करणाऱ्या दैनिकाच्या वर्धापनदिनी सर्वांनीच आवर्जून हजेरी लावली. शब्द, सुमने आणि विश्वासाचा हा सोहळा सर्वांना चिंब करणारा ठरला.
अल्पावधीत लाखो वाचकांच्या गळ्यातील ताईत झालेल्या "दिव्य मराठी'च्या वर्धापनदिनी राजकारण, कला क्षेत्र, क्रीडाविश्व, विविध प्रशासकीय अधिकारी, महिला मंडळे, डॉक्टर्स, व्यापारीवर्ग, शिक्षण क्षेत्र, पोलिस अधिकारी, साहित्यिक, विचारवंत अशा सर्वांनी आवर्जून उपस्थिती लावत शुभेच्छा दिल्या.
विविधक्षेत्रांतील मान्यवरांची हजेरी : केंद्रीयऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार इम्तियाज जलील, संजय शिरसाट, अतुल सावे, नारायण कुचे, सुभाष झांबड, सतीश चव्हाण, विक्रम काळे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृह नेता राजेंद्र जंजाळ, माजी आमदार किशनचंद तनवाणी, डॉ. कल्याण काळे, प्रदीप जैस्वाल, गंगाधर गाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे मधुकर मुळे, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, महानगरपालिका आयुक्त प्रकाश महाजन, पोलिस आयुक्त अमितेशकुमार, पोलिस अधीक्षक (औरंगाबाद ग्रामीण) नवीनचंद्र रेड्डी, सहायक पोलिस आयुक्त बाबाराव मुसळे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक प्रवीण मोरे, अविनाश आघाव, रामेश्वर थोरात, उपायुक्त डॉ. विजयकुमार फड, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत, अपर जिल्हाधिकारी विजय सोरमारे, उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, निवृत्त विभागीय आयुक्त कृष्णा भोगे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, घाटीचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, कॅन्सर हॉस्पिटलचे विशेष अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एन. गायकवाड, अधीक्षक डॉ. सुहास जेवळीकर, डॉ. मंगला बोरकर, शिक्षण उपसंचालक सुधाकर बनाटे, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, बाबा भांड, श्याम देशपांडे, उद्योजक मुकुंद भोगले, सीआयआयचे माजी अध्यक्ष प्रशांत देशपांडे, के. एस. अतकरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
शुभेच्छापत्रे, चित्रकृती, रेखाटनाची भेट
शुभेच्छांच्यावर्षावात प्रत्येक 'दिव्य मराठी' सदस्य न्हाऊन निघत असतानाच अचानक वरुणराजानेही काही क्षण का असेना आवर्जून हजेरी लावली अन् सोहळ्याला आणखी सुखद केले. सायंकाळी वाजेपासून रात्री पावणेअकरा वाजेपर्यंत शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ लागली होती. मान्यवरांनी पुष्पगुच्छ, शुभेच्छापत्रे, रेखाटने आणि चित्रकृतींची भेट दिली.
केंद्रीय ऊर्जा कोळसा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी वर्धापनदिनी राज्य संपादक प्रशांत दीक्षित, सीओओ निशित जैन यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी डावीकडून भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, एकनाथ जाधव, ज्ञानोबा मुंडे, डॉ. भागवत कराड, अॅड. प्रदीप देशमुख आदी. दुसऱ्या छायाचित्रात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि आमदार सतीश चव्हाण यांनीही शुभेच्छा दिल्या.
छाया : माजिद खान