आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Divya Marathi Abhiyan Eco friendly Ganesh With Clay

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभियान दिव्य मराठी : शाडू मातीच्या दीडशे मूर्तींची वैजापुरात प्रतिष्ठापना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - शहरातयंदाच्या वर्षातील गणेशोत्सव पर्यावरणपूरक होण्याच्या उद्देशाने साजरा करण्याच्या चळवळीला मोठा प्रतिसाद गणेशभक्तांकडून मिळाला आहे. जवळपास दीडशे कुटुंबातील सदस्यांनी शाडू मातीपासून तयार करण्यात आलेल्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणास हातभार लागला आहे.

दिवसेंदिवस पर्यावरणाचा बिघडता समतोल नागरिकांकडून पर्यावरणाचा स्वहितासाठी होणारा ऱ्हास यामुळे येथील पर्यावरणप्रेमी शिक्षक संजय गायकवाड, माधव कासार, अंजुम पठाण, किशोर साळुंके, उत्पल संपत या तरुणांनी गणेशोत्सवादरम्यान पर्यावरण रक्षणासाठी विविध उपक्रम राबवण्याबरोबरच जनजागृतीची चळवळ सुरू केली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात अधिक प्रमाणात शाडू मातीच्या गणपतींची गणेशभक्तांनी स्थापना करावी या भूमिकेला मूर्तस्वरूप देण्यासाठी येथील महादेव मंदिर परिसरात गणेशोत्सवाला आरंभ होण्याच्या आठ दिवस अगोदर औरंगाबाद येथील मोरया फाउंडेशनच्या सहकार्याने बालगोपळासह गणेश भक्तांना पर्यावरणपूरक शाडू मातीचे गणपती तयार करण्याचे प्रशिक्षण शिबिर दिवसभर घेण्यात आले. या शिबिरात अनेकांनी आपल्या कला कौशल्यातून शाडू मातीपासून विविधरूपी बाप्पाच्या सुबक मूर्ती तयार करण्याचे धडे गिरवले. पीओपी गणेशमूर्तीमुळे होणारे जलप्रदूषण अशा अनेक दुष्परिणामांची माहिती श्रीधर ठाकरे, अभिजित आमले यांनी दिली.

आवाहनकरता प्रत्यक्ष कृती
दरवर्षीनवनवीन संकल्पनेतून उत्साही गणेशभक्त हा महोत्सव आनंदात साजरा करतात. पण पर्यावरणाचे संवर्धन,रक्षण करण्यासाठी याकडे फारसे कोणी लक्ष देत नसल्यामुळे अनेक पर्यावरणविषयक समस्येला आपल्याला सामोरे जावे लागते, तीन वर्षांपासून शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव आनंदीमय वातावरणात साजरा करावा यासाठी विविध उपक्रमाचे आवाहन करता त्याला प्रत्यक्षात कृतीची जोड देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे संजय गायकवाड, किशोर साळुंके यांनी सांगितले.
मुलाने बनवलेल्या श्रींची केली स्थापना
पंचायत समिती शिक्षण विभागातील लिपिक अविनाश पारळकर यांचा मुलगा वेदांत याने स्वतः तयार केलेल्या मूर्तीची स्थापना घरात केली आहे. त्याच्या या भूमिकेचे स्वागत करून पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य दिल्याचा आनंद कुटुंबाला मिळाला असल्याचे अविनाश यांनी सांगितले.