आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सूरज खरे ठरला ‘दिव्य मराठी’चा कार विजेता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ‘दिव्य मराठी’तर्फे सोमवारी भाग्यवान वाचकांची सोडत जाहीर करण्यात आली. यात उस्मानपुरा येथील सूरज खरे हा भाग्यवान विजेता ठरला. त्याला महापौर अनिता घोडेले यांच्या हस्ते ‘ह्युंदाई ई ऑन’ कारच्या चाव्या देण्यात आल्या. हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये आयोजित कार्यक्रमात 78 भाग्यवान वाचकांची निवड करण्यात आली. यात अहिंसानगर येथील नितीन शिंगवी यांना द्वितीय, उल्कानगरी येथील प्रदीप वैद्य यांना तृतीय पारितोषिक देण्यात आले.
‘दिव्य मराठी’ने नावनोंदणीसाठी सोडत आयोजित केली होती. याला शहरातील हजारो वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सोडतीत भाग्यवान ठरणार्‍या विजेत्यांना कार, दुचाकी, टॅब्लाइड, टीव्ही, मायक्रोव्हेव आदी आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत.
सोडतीचा ड्रॉ काढण्यासाठी सोमवारी सायंकाळी महापौर अनिता घोडेले, सानिया मोटर्सचे संचालक सचिन मुळे, एमआयटीचे संचालक मुनीश शर्मा, धूत ह्युंदाईचे संचालक मनीष धूत, दिशा कन्स्ट्रक्शनचे संचालक देवानंद कोटगिरे, नरहरी बिल्डर्सचे संचालक अनिल सोनवणे, अमृत डेव्हलपर्सचे संचालक विवेक शक्करवार, एसबीएचचे उपमहाव्यवस्थापक अजॉय नकीब, ए. एम. ह्युंदाईचे संचालक जुबेर मोतीवाला, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष अण्णा जगताप, सानिया मोटर्सचे डिस्ट्रिब्युटर्सचे पंकज अग्रवाल, धूत ह्युंदाईचे व्यवस्थापकीय संचालक विकास वाळवेकर, ‘दिव्य मराठी’चे युनिट हेड आलोक वर्मा, जाहिरात व्यवस्थापक सुभाष बोंद्रे, नरेंद्र सोलंकी, अभय अक्कर, बाळासाहेब खवले, दिलीप डिघुळे, वर्धमान मोहेकर, वितरणचे मुख्य महाव्यवस्थापक अनिल सिंग, वितरणचे स्टेट हेड धीरज रोमन, वितरण व्यवस्थापक भालचंद्र चौधरी, सुर्शुत ठक्कर, शेख नवेद, मनीष शर्मा, अनिल सावंत, संदीप तुरुके, वर्तमानपत्र विक्रेता संघटनेचे सचिव नीलेश फाटके, शेख फहीम, काकासाहेब मानकापे, शेख बदरोद्दीन, विष्णू ढाकणे, सीताराम तुर्कमाने, गणेश भोसले, दौलत बरबडे आदींची उपस्थिती होती.

मला मिळालेली भेटवस्तू अनपेक्षित आहे. मागील वर्षापासून मी ‘दिव्य मराठी’चा वाचक आहे. ‘हजारो वाचकांमधून झालेली निवड आनंददायी आहे. माझ्या आयुष्यातील हा अविस्मरणीय प्रसंग आहे.’’ सूरज खरे, प्रथम भाग्यवान विजेता