आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi City Walk 4 Initiative News In Marathi, Aurangabad, Buddhacaves

दिव्य मराठीचा सिटी वॉक-4 उपक्रम: अचंबित करणारी बुद्धलेणीतील शिल्पे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सिटी वॉक उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील महत्त्वाच्या वास्तूंचा इतिहास उलगडून सांगितला जात आहे. या रविवारी शहरवासीयांनी औरंगाबाद लेणींच्या निर्मितीचा इतिहास जाणून घेतला. आजवर केवळ मौजमजा म्हणून येथे फेरफटका मारणार्‍या स्थानिकांना व पर्यटकांना लेणींचा इतिहास कळाल्यानंतर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. लेणींवर साकारण्यात आलेली शिल्पेही अचंबित करणारी आहेत.


सकाळी 8 वाजता लेणी क्रमांक एकमधून उपक्रमाला सुरुवात झाली. इतिहास अभ्यासक डॉ. दुलारी कुरेशी यांनी लेणींच्या निर्मितीपासूनच्या इतिहासाबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या, इ. स. पहिल्या ते सातव्या शतकादरम्यान अग्निजन्य स्तरीत खडकामध्ये या लेणींची निर्मिती झाली. दगडांवर अतिशय सुंदर शिल्पे साकारण्यात आली असून त्यातील जिवंतपणा वाखाणण्याजोगा आहे. लेणीतील प्रत्येक शिल्प पाहिल्यानंतर त्या काळातील कलाकार किती प्रतिभावान होते याची प्रचिती येते. लेणी क्रमांक एकमध्ये व्हरंडा आणि प्रवेशद्वारावर तसेच स्तंभावर सुंदर कोरीव काम आहे, तर लेणी क्रमांक तीनमध्ये स्तंभांवरील शिल्पे अगदी बोलकी आहेत. औरंगाबाद लेणींबद्दल फारसे कुठे लिहिण्यात आलेले नाही. त्यामुळे ‘सिटी वॉक’मध्ये सहभागी झालेल्यांना लेणींबद्दल अनेक रंजक गोष्टी कळाल्याची प्रतिक्रिया शहरवासीयांनी व्यक्त केली.