आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Eco Friendly Ganesh Festival Aurangabad

‘दिव्य मराठी’च्या इको फ्रेंडली गणेशमूर्ती उपक्रमाला प्रतिसाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ‘पर्यावरणाशी नाळ जोडा, इको गणेशाला वंदन करा’ या अभियानांतर्गत ‘दिव्य मराठी’ने इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवण्याचे मोफत प्रशिक्षण शिबिर घेतले. मंगळवारी या शिबिराचा यशस्वी समारोप झाला. विविध शाळांतील विद्यार्थी तसेच अनेक मान्यवरांनी या शिबिरात सहभागी होत शाडूपासून गणेशमूर्ती घडवल्या.
शिबिरात 5 वर्षांच्या चिमुकल्यापासून 65 वर्षांच्या आजीबाईंनी कल्पकता वापरून सुंदर, सुबक गणेशमूर्तींना मूर्त रूप दिले. प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्यात कलात्मकता आहे, अशी अनुभूती अनेक जणांना झाल्याची प्रतिक्रिया मान्यवरांनी दिली. तीन दिवसात जवळपास 400 जणांनी गणेशमूर्ती बनवण्याचे धडे गिरवले. यात उस्मानपुरा येथील मनपा शाळा, ज्ञानांकु र विद्यालय, ज्ञानदा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा समावेश होता. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पुढाकार घेऊन सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे शिबिरार्थींनी कौतुक केले. शिबिरार्थींनी जितक्या मूर्ती घडवल्या त्या सर्वांची प्रतिष्ठापना घरीच केली जाणार आहे. समारोपाच्या दिवशी प्रशिक्षण शिबिरात रवींद्र तोरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदू वानखेडे, रोहित चव्हाण, सुनील ससाणे, संतोष पवार, भाग्यर्शी ठोंबरे, दक्षता वाघ, सचिन साबळे, कमलेश पाटील, गौरी शिवपूजे, मधू बोराडे, सारिका नाईक आदींनी मदत केली. या वेळी यशवंत कला महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक तांबटकर यांची उपस्थिती होती.