आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Exclusive: Passengers Decrease Says Railway

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह: प्रवासी घटल्याचा रेल्वेचा कांगावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - साठहून अधिक प्रवासी तिकीट तपासणीसांचा (टीटीई) तुटवडा असल्याने रेल्वेचे फुकटे प्रवासी वाढले आणि प्रवासीसंख्येत सहा लाखांची घट नोंदवली गेली, परंतु हेच कारण पुढे करत रेल्वे मंत्रालयाने नांदेड विभागातील विकासकामांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम चालवले आहे. अपु-या यंत्रणेकडे डोळेझाक करणा-या रेल्वेने तिकीटविक्रीतून झालेल्या २०.०२ टक्के महसुली उत्पन्नवाढीकडे मात्र सोयीस्कर कानाडोळा केला आहे.

एप्रिल ते नोव्हेंबर २०१३ मध्ये २७५ लाख प्रवाशांनी प्रवास केला. यंदा हा आकडा २६९ लाखांवर आला. २.२९ टक्क्यांची ही घट विकास योजनांच्या मात्र मूळावर उठली आहे. अनेक प्रस्ताव या कारणामुळे मंत्रालयाकडून परत पाठवले जात आहेत. हे करताना फुकट्या प्रवाशांना रोखण्यासाठी तिकीट तपासणीस व सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यासाठी मात्र पावले उचलली जात नाहीत.

हे प्रस्ताव परत
-मनमाड ते परभणी दुहेरीकरण
-अकोला-खांडवा गेज कन्व्हर्जन
-मुदखेड-परभणी दुहेरीकरण
-मॉडेल स्टेशनचे निर्माण
-पिटलाइन, रेल्वे डिझेल लोकोशेड

प्रवासी वाढवावे लागतील
प्रवासी वाढत नाहीत तोवर प्रलंबित मागण्या पूर्ण होणार नाहीत. प्रत्येक वेळी पाठविलेला प्रस्ताव प्रवासी संख्या घटल्याचे कारण देऊन परत पाठवला जातो. -प्रकाश निनावे, सहायक रेल्वे व्यवस्थापक, नांदेड.