आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य प्रॉपर्टी एक्स्पो: बजेटमध्ये घर घेण्याची आज शेवटची संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर स्वत:चे घर घेणाऱ्या इच्छुकांनी "दिव्य प्रॉपर्टी एक्स्पो-२०१५'ला भेट देऊन विविध स्टॉलवर जाऊन प्रकल्पांची चौकशी केली. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला हव्या तशा घराचा शोध घेण्यासाठी अनेक बिल्डरांची माहिती घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे "दिव्य मराठी'ने कर्ज सुविधा देणाऱ्या बँका, वास्तुशास्त्र िवशारद आणि िबल्डर्सच्या विविध प्रोजेक्टची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून दिली आहे. शहरात गुंतवणूक म्हणून घर घेणारे आणि तरुण, महिलांनी एक्स्पोला भेट दिली.

'दिव्य मराठी' आणि क्रेडाई यांच्या वतीने आयोजित १७ ते १९ एप्रिलदरम्यान 'दिव्य प्रॉपर्टी एक्स्पो'ला शहरवासीयांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. "दिव्य मराठी' कार्यालय, मोतीवाला कॉम्प्लेक्स, जालना रोड येथे सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये तेराशेहून अधिक ग्राहकांनी भेट दिली असून अनेक जणांनी पसंतीच्या घरांना सकारात्मक प्रतिसाद देत बुकिंगसंदर्भात नोंदणीही केली आहे. एक्स्पोमध्ये शहरातील नामवंत बांधकाम व्यावसायिकांनी सहभाग नोंदवला आहे. तसेच कर्ज प्रक्रिया, नियम आर्थिक बाबींसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय बँकांनीही यात सहभाग घेतला आहे. अत्याधुनिक रचना असलेल्या घरांपासून ते उद्योग, व्यवसायाच्या दृष्टीने जागा, प्लॉट, दुकाने घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठीही एक्स्पो हा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. एकाच छताखाली सर्व पर्याय, नामवंत बांधकाम व्यावसायिकांच्या कंपन्या, विविध ठिकाणच्या घरांची माहिती, किमती आदी गोष्टींविषयी माहिती एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने नागरिकांना एक समर्थ पर्याय या मेळाव्याने उपलब्ध करून दिला आहे. रविवारी मेळाव्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे एक्स्पोचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...