आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Green Idol Award Distribution Aurangabad

ग्रीन आयडॉल अवॉर्डने आठ जणांचा सन्मान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पर्यावरण संरक्षणासह हिरवळीला प्राधान्य देणार्‍या आठ जणांचा ‘दैनिक दिव्य मराठी ग्रीन आयडॉल अवॉर्ड’ देऊन गौरव करण्यात आला. ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात गुरुवारी (5 सप्टेंबर) हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

दैनिक भास्कर समूहातर्फे राज्यस्तरीय ग्रीन आयडॉल अवॉर्ड्सचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. वैयक्तिक आणि समूह पातळीवर पर्यावरण संवर्धनासाठी काम करणार्‍या व्यक्ती व संस्थांना हा अवॉर्ड दिला जातो. यामध्ये मोठय़ा संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. सहभागी स्पर्धकांनी पर्यावरण रक्षणासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. मात्र, स्पर्धा असल्याने त्यापैकी वैयक्तिक गटातून पाच आणि समूह गटातून तीन अशा आठ जणांची अवॉर्डसाठी निवड करण्यात आली. 5 सप्टेंबर रोजी ‘दिव्य मराठी’चे बिझनेस हेड निशित जैन यांच्या हस्ते अवॉर्ड आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

तीन सदस्यीय समितीने केली पुरस्कार विजेत्यांची निवड : पर्यावरणमित्र दिलीप यार्दी, निशिकांत भालेराव आणि सुनील सुतवणे या तीन सदस्यीय समितीने शेकडो केली. केवळ पर्यावरण संवर्धन नव्हे तर समाजाभिमुख कार्य, जल, ध्वनी, वायुप्रदूषण रोखण्यास आरोग्य, शिक्षण, संस्कृती आदींमध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या आठ जणांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी करून आभार मानले.

काय म्हणतात पुरस्कार विजेते
नवीन पिढीसाठी पर्यावरण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या दृष्टीने आम्ही पर्यावरण संवर्धनासाठी काम करीत आहोत. जंगलाच्या ठिकाणी आम्ही फुलबाग फुलवली आहे. साडेतीन हजार वृक्षांची लागवड केली आहे. वॉटर हार्वेस्टिंग करून वाया जाणारे पाणी जमिनीत जिरवले आहे. पुढे आणखी 720 फूट एरिया आहे. तो विकसित करण्याचा आमचा मानस आहे. या पुरस्कारामुळे पर्यावरण संवर्धनाची आमच्यावरील जबाबदारी आणखी वाढली आहे. श्याम जैन, जनरल मॅनेजर, स्टेट बँक केंद्र

साईबाबा खाली बसले होते. एक मुलगा तेथे आला आणि त्यांना म्हणाला, बाबा, आपण जमिनीवर का बसलात? यावर साई म्हणाले, जो जमिनीवर बसतो तो कधी पडत नाही. हा संदेश मी मनोमन पाळतो. मला 7 हजार 568 पुरस्कार मिळाले असून ‘दिव्य मराठी’ने आणखी एक पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. अमोल बागूल, प्रथम पुरस्कार विजेते

ग्रीन आयडॉल अवॉर्डचे मानकरी
वैयक्तिक गट
क्रमांक नाव जिल्हा
प्रथम अमोल बागूल अहमदनगर
द्वितीय कौतिकराव जंजाळ जालना
तृतीय साधना निकम जळगाव
चौथा अपर्णा चांदजकर औरंगाबाद
पाचवा विश्वनाथ कुळे औरंगाबाद
समूह गट
प्रथम स्टेट बँक केंद्र औरंगाबाद
द्वितीय सीटीआर औरंगाबाद
तृतीय सिनिक ग्रुप धुळे