आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर खान रविवारच्या अंकाचे अतिथी संपादक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दैनिक भास्कर समूहाच्या दै. ‘दिव्य मराठी’च्या 2 मार्च रोजी प्रसिद्ध होणार्‍या अंकाचे अतिथी संपादक म्हणून प्रसिद्ध अभिनेता आमिर खान काम पाहणार आहेत. एक मार्च रोजी आमिर दैनिक भास्करच्या कार्यालयात असतील आणि एखाद्या संपादकाप्रमाणे बातम्यांची निवडही करतील.

दैनिक भास्कर समूह या उपक्रमात वाचकांनाही सहभागी करून घेणार आहे. यासाठी तुम्ही तुमचे प्रश्न आमच्याकडे पाठवून द्या. त्यातील निवडक प्रश्न आमिर खान यांना विचारले जातील. त्यांनी दिलेली उत्तरे तुमच्या नावासह प्रसिद्ध केली जातील.
तुम्ही तुमचे प्रश्न एसएमएसच्या माध्यमातून पाठवू शकता. एसएमएससाठी सुरुवातीला Amir असे लिहून पुढे प्रश्न टाइप करा आणि पाठवून द्या..09200012345 वर