महाराष्ट्राच्या क्षितिजावर 'दैनिक दिव्य मराठी'चा 2011 मध्ये उदय झाला. अवघ्या पाच वर्षांमध्ये 'दिव्य मराठी'ने एक निर्भीड आणि निडर वृत्तपत्र म्हणून वाचकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. तोपर्यंत राज्यात सुरु असलेली पक्षपाती पत्रकारितेची परंपरा 'दिव्य मराठी'ने संपवली. यामुळेच वाचकांनी 'दिव्य मराठी'ला मनापासून स्विकारले. एवढेच नाही, तर महाराष्ट्रातील एक प्रमुख वृत्तपत्र म्हणून स्थान दिले.
'दिव्य मराठी' स्वतंत्र विचार आणि निर्भीड व निडर पत्रकारितेचे प्रतिबिंब बनत आहे. स्वातंत्र्य जपण्यासाठी खडतर मार्गावरून चालावे लागते, कधी प्रवाहाच्या विरोधात बोलावे लागते, स्वतंत्र दृष्टिकोन घडविण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतात. असे प्रयत्न ही 'दिव्य मराठी' वृत्तपत्राची बांधिलकी आहे. मराठी वाचकांची मुक्त विचारांनी जगण्याची मनोकामना पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत राहणे हे आमचे कर्तव्य आहे. विचारांचे, आचारांचे स्वातंत्र्य जपण्यासाठी मदत करणारा 'दिव्य मराठी' हा वाचकांचा मित्र आहे. वाचकांप्रति असलेली ही बांधिलकी जपण्यासाठी कटिबद्ध आहे.