आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी इंडस्ट्रीज एक्सलन्स अवाॅर्ड, बारवालेंना जीवनगाैरव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्य मराठी इंडस्ट्रीज एक्सलन्स अवाॅर्डचा शानदार सोहळा शनिवारी हॉटेल रामामध्ये झाला. बियाणे क्षेत्रात भारताची मान उंचावणारे, महिको कंपनीचे संस्थापक, प्रख्यात उद्योजक व पद्मविभूषण डॉ. बद्रीनारायण बारवाले यांना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी सीटीए कंपनीचे कार्यकारी संचालक प्रशांत धुमाळ, दै. "दिव्य मराठी'चे सीओओ निशित जैन, अजित सीड‌्सचे संस्थापक, संचालक पद्माकर मुळे, दै. "दिव्य मराठी'चे राज्य संपादक प्रशांत दीक्षित यांची उपस्थिती होती. माझ्या गावातील वृत्तपत्राने केलेल्या या सन्मानाचा मला मनस्वी आनंद वाटतो, अशी भावना बारवाले यांनी या वेळी व्यक्त केली.
छाया : अरुण तळेकर
बातम्या आणखी आहेत...