आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - हल्ली आपण अतिसंवेदनशील बनलो आहोत. आपली विनोदबुद्धी गमावली आहे. त्यामुळे धर्म, राजकारण, महिला, रूढी, परंपरा यावरील विनोद सहन होत नाही, अशी खंत अॅडगुरू भरत दाभोळकर यांनी व्यक्त केली.
संत तुकाराम नाट्यमंदिरात शनिवारी सायंकाळी दै. दिव्य मराठीच्या इंडस्ट्री एक्सलन्स पुरस्कारांचे भरत दाभोळकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, कुणासमोर काय दिले पाहिजे याचा विचार करून जाहिराती केल्या जातात. शिवाय ग्राहकांसमोर अनेक पर्याय असल्याने अमुक एक उत्पादन घ्या, असे सांगण्यासाठी कल्पक कथानक वापरून जाहिराती तयार कराव्या लागतात.
या वेळी व्यासपीठावर एम. पी. शर्मा (उपाध्यक्ष, व्हेरॉक), गोविंद अग्रवाल (ग्रँड कल्याण अध्यक्ष), सचिन मुळे (सारा मोटर्सचे संचालक), रामदास गायकवाड (गायकवाड क्लासेसचे संचालक), निशीत जैन (स्टेट बिझनेस हेड, दिव्य मराठी), अभिलाष खांडेकर (स्टेट एडिटर, दिव्य मराठी) यांची उपस्थिती होती.
इंडस्ट्री एक्सलन्स पुरस्कारासाठी निवड करणार्या परीक्षक मंडळात सीएमआयएचे माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, उद्योजक डॉ. उल्हास गवळी, उद्योजक मोहिनी केळकर, उद्योजक राजकुमार कोठारी, मासिआचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी, उद्योजक संदीप नागोरी, उद्योजक झोएब येवलावाला, उद्योजक मनोज गुप्ता, उद्योजक सौरभ भोगले यांचा समावेश होता. त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.