आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Divya Marathi Letter Writing Competition At Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘दिव्य मराठी’तर्फे रक्षाबंधनानिमित्त पत्रलेखन स्पर्धा स्पर्धेत संतोष कवडे प्रथम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- रक्षाबंधनानिमित्ताने ‘दिव्य मराठी’तर्फे आयोजित पत्रलेखन स्पर्धेत संतोष कवडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेचे बक्षीस वितरण सोमवारी सायंकाळी ‘दिव्य मराठी’ कार्यालयात झाले.
बहीण-भावातील भावपूर्ण नाते रक्षाबंधनाच्या दिवशी अधिक दृढ होते. या नात्यात दडलेले भावबंध उलगडण्यासाठी ‘दिव्य मराठी’तर्फे अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बहीण-भावांनी परस्परांबद्दल भावना व्यक्त करणारे पत्रलेखन करावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक वाचकांनी त्यांचे मनोगत अतिशय हृदयस्पर्शी शब्दांमध्ये मांडले. त्यातील नऊ जणांची बक्षिसासाठी निवड करण्यात आली. विजेत्यांना ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक धनंजय लांबे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. धकाधकीच्या जीवनात नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. ती नाती जोडण्याचे काम या स्पर्धेच्या निमित्ताने झाल्याचे पत्रलेखन स्पर्धेतील विजेते म्हणाले. ‘दिव्य मराठी’ सातत्याने निर्भीडपणे लोकांचे प्रश्न मांडत आहे. सामान्य लोकांशी संबंधित असलेल्या अनेक विषयांची सविस्तर माहिती असते. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्याच नव्हे, तर जगभरातील बातम्या ‘दिव्य मराठी’मध्ये असतात, असे मारुती अरुण मराठे, पद्माकर पवार, आनंदकिशोर मालपाणी, अमोल लंभे, संध्या मोहिते-खरात यांनी सांगितले.