आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi, Lokmat, Times Group, Photographer In Inter Press Cricket Competition

दिव्य मराठी, लोकमत, टाइम्स ग्रुप, फोटोग्राफर सेमीफायनलमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दर्पणकारबाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे दुसऱ्या इंटर प्रेस क्रिकेट स्पर्धेत दैनिक दिव्य मराठी, लोकमत, टाइम्स ग्रुप प्रेस फोटोग्राफर संघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत पहिल्या लढतीत लोकमतने सामना संघावर ११ धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या लढतीत प्रेस फोटोग्राफर संघाने वृत्तवाहिनी संघावर ६० धावांनी मात केली. तिसऱ्या लढतीत ‘दिव्य मराठी’ने सकाळ संघाला ५६ धावांनी नमवले. चौथ्या लढतीत टाइम्स ग्रुपने पुण्यनगरी संघावर गड्यांनी मात केली. स्पर्धेच्या उद््घाटनप्रसंगी ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक प्रशांत दीक्षित, शिवछत्रपती पुरस्कार विजेते शिरीष बोराळकर, प्रा. गोपीचंद चाटे, प्रा. रामदास गायकवाड, उद्योजक अर्जुन गायके, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक धनंजय लांबे, ‘लोकमत’चे संपादक सुधीर महाजन, चक्रधर दळवी, ‘सामना’चे सहायक संपादक गणेश तुळशी, ‘लोकनायक’चे संपादक प्रा. बाबा गाडे, ‘भास्कर’चे निवासी संपादक अब्दुल कदीर, डाॅ. अनिल फळे, ‘दिव्य मराठी’चे सिटी इन्चार्ज श्रीकांत सराफ यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी पंडित बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. दिव्य मराठीचे वृत्तसंपादक बालाजी सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचे स्वागत सुनीलचंद्र वाघमारे, कानिफ अन्नपूर्णे, सुभाष पाटोळे यांनी केले. यानंतर नाणेफेक करून उद्घाटनीय सामन्यास सुरुवात करण्यात आली.

आजचे सामने : पहिला सामना लोकमत वि. प्रेस फोटोग्राफर सकाळी 8 वाजता. दुसरा सामना दिव्य मराठी वि. टाइम्स ग्रुप सकाळी ९.३० वाजता.

‘दिव्य मराठी’ विजयी
‘दिव्यमराठी’ने १० षटकांत बाद ८९ धावा उभारल्या. यात सलामीवीर भागवत पांचाळ धावा करून बाद झाला. दुसरा सलामीवीर योगेश जैस्वालने १८ चेंडूंत चौकार खेचत २५ धावा ठोकल्या. भारत दुधाटे आणि कर्णधार हरेंद्र केंदाळे धावा करून तंबूत परतले. त्यानंतर आलेल्या सुमेर हिवरेकरने ११ चेंडूंत चौकार लगावत १८ धावा जोडल्या. ऋषिकेश जीवनवालने आणि मयूर रत्नपारखीने धावा केल्या. सकाळकडून मनोज साखरेने बळी घेतले. प्रत्युत्तरात सकाळ १० षटकांत सर्वबाद ३३ धावा करू शकला. ‘दिव्य मराठी’च्या योगेश जैस्वालने ३, मयूर रत्नपारखी आणि ऋषिकेश जीवनवालने प्रत्येकी गडी बाद केले.