आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"मधुरिमा'च्या हळदी-कुंकू उपक्रमाला उदंड प्रतिसाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दिव्य मराठी मधुरिमा क्लबतर्फे आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमास शनिवारी उदंड प्रतिसाद मिळाला. ज्या मधुरिमा सदस्यांना आज वाण मिळू शकले नाही त्यांनी मधुरिमाच्या विभागीय अध्यक्षांना मोबाइलवर संपर्क साधल्यास वाणाच्या रूपातील भेटवस्तू त्यांना मिळू शकेल.
मधुरिमातर्फे १७ जानेवारीला हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात साई सुवर्णचाफातर्फे जोडवी, टिटाे कंपनीतर्फे ऑर्गेनिक गूळ पावडरीच्या पाकिटाचे िवतरण करण्यात आले. या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. महिलांनी रांगा लावून वाण लुटले. ज्या महिलांना वेळेअभावी जोडवी, गूळ पावडरीचे पाकीट मिळू शकले नाही, त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांनी मयूरी खंडेलवाल ९०४९९५८९९५, मंजू खंडेलवाल ९०२३५८८३१५, मनीषा काळे ९८२२९४६९०५, रंजना तुळशी ९२०९२८४०८२, अश्विनी निटूरकर ९४०३५३२२४६ यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करावी. त्यांना पेंडंट किंवा कर्णफुले किंवा ऑर्गेनिक गूळ पावडर यापैकी एक आणि फक्त एकच भेट दिली जाणार आहे.
‘सायबरलॉ’विषयी मार्गदर्शन : दरम्यान,हळदी-कुंकू कार्यक्रमात अॅड. सुदर्शना जाधव यांनी सायबर लॉमधील महिलांसाठी उपयुक्त कलमांची माहिती दिली. फेसबुक, व्हॉट्सअॅप, यू ट्यूबचा काही वेळा गैरवापर होतो. महिला, मुलींचे फेसबुकवरील फोटो डाऊनलोड करून ते विकृत रूपात एडिट केले जातात. ते सोशल नेटवर्किंग किंवा पॉर्न साइटवर टाकले जातात. फेसबुकवर महिला, मुलींच्या मूळ प्रोफाइलवरून बनावट प्रोफाइल केले जातात. यालाच आयडेंटिटी थेफ्ट म्हटले जाते. याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार केल्यास आयटी अमेंडमेंट अॅक्ट २००८ मधील ६६ कलमानुसार आरोपीला तीन वर्षे कारावास एक लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. मोबाइल, इंटरनेटचा वापर करून जे अश्लील एसएमएस पाठवले जातात अशा प्रकरणात भारतीय दंड विधानाच्या कलम ५०९ आयटी अॅक्ट ६६ कलमानुसार दोन ते तीन वर्षे कारावास दंड केला जातो. अश्लील साइट्सवर वेगवेगळे ग्राफिक्स करून महिला, मुलींचे चारित्र्यहनन केले जाते. अशा आरोपींना आयटी अॅक्ट ६७ नुसार वर्षे कारावास, दहा लाखांचा दंड किंवा सात वर्षे कारावास दहा लाखांचा दंड केला जातो.
सेंद्रियशेतीतून तयार केलेला गूळ उपयुक्त : याचकार्यक्रमात टिटो कंपनीतर्फे ऑर्गेनिक गूळ पावडरीचे वाटप करण्यात आले. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वैशाली इनामदार म्हणाल्या, आपल्या दैनंदिन आहारात पोषक, शुद्ध अन्न ग्रहण करत आहोत का? याचा विचार करावा. कारण शुद्ध, सात्त्विक अन्नधान्य आज उपलब्धच नाही. रासायनिक शेतीतून उत्पादित अन्नधान्यामुळे आपल्या शरीरात नकळतपणे विष जात आहे. महिला रासायनिक महागड्या वस्तू सहज खरेदी करतात. मात्र ऑर्गेनिक वस्तू घेताना खूप विचार करतात आणि आजारांना निमंत्रण देतात. रासायनिक गुळातील कॉस्टिक सोडा, सल्फरसारखी रासायनिक द्रव्ये हानिकारक आहेत, असेही त्या म्हणाल्या. साईसुवर्ण चाफाच्या साळवे, "टिटोज'च्या डॉ. वैशाली इनामदार यांच्या हस्ते वाणाचे वाटप झाले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मयूरी खंडेलवाल, मंजू खंडेलवाल, कविता विजयवर्गीय, शमा खान, कांचन सोनी, मनीषा काळे, धनश्री तिळवणकर, रंजना तुळशी, कल्पना सूर्यवंशी, गीता होनकळसे यांनी सहकार्य केले.