आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Mobile Edition Launch, Latest News In Marathi

‘दिव्य मराठी’ वाचा मोबाइलवर, वेगात वाढणारी मराठी वेबसाइट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अल्पावधीत वाचकांच्या पसंतीस उतरलेली divyamarathi.com ही मराठी वेबसाइट मोबाइलवर वाचणे आता अधिक सोपे झाले आहे. या वेबसाइटची मोबाइल एडिशन लाँच करण्यात आली आहे. इंटरनेट स्पीड कमी असली तरी प्रत्येक क्षणी ताज्या घडामोडी जाणून घेणे मोबाइल एडिशनमुळे मोबाइलधारकांना शक्य होणार आहे.
मोबाइल एडिशनमध्ये ठळक बातम्या, न्यूज प्लस, बॉलीवूड, जीवनमंत्र, स्पोर्ट्स, बिझनेस, ह्यूमर, मुक्त व्यासपीठ, फोटो गॅलरी आदी मराठी सेक्शन आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, सोलापूर, अकोला, अहमदनगर, कोल्हापूर, ठाणे, रत्नागिरी येथील स्थानिक बातम्या वेळोवेळी दिल्या जात आहेत. दैनंदिन राशिभविष्यासाठी स्वतंत्र जागा देण्यात आल्याने दररोज अपडेट होणारे भविष्य वाचणे अधिक सुलभ झाले आहे. यासह हिंदी, गुजराती आणि हिंदी मोबाइल एडिशनची लिंक देण्यात आली आहे. यामुळे या तिन्ही भाषांत जगभरातील बातम्या जाणून घेणे सहज शक्य झाले आहे.
तळाशी असलेल्या "साइट मॅप' ऑप्शनवर क्लिक करा. साइटवरील मजकुराचा आराखडा समोर उभा राहतो. हवे ते ऑप्शन निवडता येतात. मोबाइल एडिशन वाचायची नसेल तर 'फुल साइट' नावाचे ऑप्शन 'साइट मॅप'च्या शेजारी आहे. त्यावर क्लिक केल्यास संगणक वा लॅपटॉपवर उघडते, त्याच स्वरूपात आवृत्ती मोबाइलवर वाचता येईल.

divyamarathi.com जलद गतीने वाढणारी मराठी वेबसाइट असून 24x7 अपडेट केली जाते. विदेशात आणि भारतातील इतर राज्यांमध्ये राहणाऱ्या मराठी लोकांना मायभूमीशी जोडण्यात या वेबसाइटने मोलाची कामगिरी बजावली आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतांतील बातम्यांना समान न्याय देण्याची भूमिका चोख पार पाडण्यात येत आहे. वैविध्यपूर्ण बातम्या, विश्लेषणात्मक लेख, संपादकीय आणि माहितीपूर्ण फीचर्स वाचकांच्या पसंतीनुसार देण्यात येत आहेत. या वेबसाइटचे अ‍ॅप लवकरच लाँच केले जाणार आहे.